महिला महाविद्यालयामध्ये “कोकेडामा प्रशिक्षण कार्यशाळा”उत्साहात संपन्न.
महिला महाविद्यालयामध्ये “कोकेडामा प्रशिक्षण कार्यशाळा”उत्साहात संपन्न.
कराड - प्रतिनिधी.
शिक्षण मंडळ,कराड संचलित महिला महाविद्यालय कराड येथे लोकमान्य ग्रीन क्लब, वनस्पतीशास्त्र विभाग व कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कोकेडामा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली.या कार्यशाळेचे उद्घाटन प्र.प्राचार्य.प्रोे.डॉ.स्नेहल प्रभुणे व उपप्राचार्य डॉ.पराग सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रमुख प्रशिक्षक प्रा.सुहासिनी पाटील उपस्थित होत्या.
आपले विचार मांडताना प्र.प्राचार्य डॉ.स्नेहल प्रभुणे मॅडम यांनी पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी पर्यावरण पूरक वस्तू वापरल्या पाहिजेत आणि इतरांना वापरण्यासाठी प्रयत्नशील केले पाहिजे याचबरोबर आपल्या महाविद्यालयातील लोकमान्य ग्रीन क्लबच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या “युवकांच्या मार्फत नैसर्गीक संसाधनाचे संरक्षण व पाणी बचत”अभियानाची अंमलबजावणी आदर्श स्वरूपात सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून कोकेडामा प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत १०० विद्यार्थीनीनी आणि अनेक प्राध्यापकांनी उस्पूर्त सहभाग घेतला होता.या कार्यशाळेचे नियोजन व प्रास्ताविक लोकमान्य ग्रीन क्लब समन्वयक प्रा.विनोद सागरे यांनी केले. त्याचबरोबर ही कार्यशाळा यशस्वी प्रा.शोभा पाटील, प्रा.किशोर गुजर प्रा.स्वप्ना केतकर याचबरोबर रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अखिलेश शिंदे, स्टाफ सेक्रेटरी प्रा.विलास सुर्वे,श्री.जयंता ढगाले कु.रोजाना मुजावर,कु. प्राजक्ता फाळके, कु.सानिका चव्हाण यांनी अथक प्रयत्न घेतले.कार्यशाळेचे सूत्र संचालन प्रा.भक्ती भालदरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सचिन करचे यांनी मानले.

Comments
Post a Comment