विद्यार्थ्यांनी अनुभव अक्षरबध्द केले पाहिजेत- कवी गुलाब मोहिते.
विद्यार्थ्यांनी अनुभव अक्षरबध्द केले पाहिजेत- कवी गुलाब मोहिते.
शिराळा - प्रतिनिधी.
एखादी घटना तुमच्या मनाला स्पर्शून जाते तिथेच कवितेचा जन्म होतो.माणसांतील संवाद वाढून जगात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे हाच माझ्या कवितेचा अंतिम उद्देश आहे असे प्रतिपादन गुलाब मोहिते यांनी केले. निव्वळ शब्द समूहांचा डोलारा उभा करणे कविता नाही तर तिच्यामध्ये आशयघनता आली पाहिजे. लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत विश्वासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालय, शिराळा येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी विभाग व ग्रंथालय विभाग आयोजित लेखक -विद्यार्थी संवाद या उपक्रमांतर्गत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.त्यांनी आई, बाप, चाळ या कविता सादर केल्या. कविता कशी सुचते व लिहीली जाते याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्र बनसोडे, उपप्राचार्य प्रा.आर.यु.पाटील ,उप प्राचार्य बी.आर.दशवंत, मराठी विभाग प्रमुख डॉ प्रकाश हुलेनवर, डॉ.शीतल धुमाळ, अर्थशास्त्र विभाग प्रमुख जी.आर.भुक्तर , राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.एस.कांबळे इत्यादी उपस्थित होते.

Comments
Post a Comment