जिल्हा परिषद शाळा पाचगणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
जिल्हा परिषद शाळा पाचगणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
शिराळा - प्रतिनिधी.
जिल्हा परिषद शाळा पाचगणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, तसेच ग्रामस्थांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. गावचे सरपंच सौ दिपाली संदीप पाटील व सेवानिवृत्त पोलीस श्री मच्छिंद्र शंकर पाटील यांनी राष्ट्रध्वज फडकवला आणि उपस्थितांनी राष्ट्रगीत गाऊन देशभक्तीची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगणारे भाषण केले. त्याचबरोबर विविध देशभक्तीपर गीते, नृत्यप्रस्तुती आणि लघुनाट्य सादर करून विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली.कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी संविधानाचे महत्त्व आणि त्याचा आपल्याला दिलेला अधिकार व कर्तव्य यावर विचार मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले. उपस्थितांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.


Comments
Post a Comment