दावोस येथे भारताचा विकास आराखडा सादर करणार; समावेशक विकास आणि डिजिटल परिवर्तनावर भर.

 

दावोस येथे भारताचा विकास आराखडा सादर करणार; समावेशक विकास आणि डिजिटल परिवर्तनावर भर.


PIB (MUMBAI ) :- 

रेल्वेमाहिती व प्रसारणतसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हे जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ) 2025 साठी दावोसला जाणार आहेत. भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ठेवलेल्यासमावेशक विकास आणि परिवर्तनशील प्रगतीकरण्यासंदर्भातील उद्दीष्टांची बांधिलकी याद्वारे अधोरेखित होईल.

दावोसला रवाना होण्यापूर्वी वैष्णव यांनी भारताने सर्व समाजघटकांनाविशेषतः प्रगतीपासून वंचित राहिलेल्या घटकांना प्रगत करण्यात केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांवर प्रकाश टाकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील तळागाळातील लोकांचे जीवन बदलण्यात सहाय्यभूत ठरणाऱ्या समावेशक विकासावर भर दिला आहेबँक खाती उघडून आर्थिक समावेशकता साधणेशौचालयेगॅस जोडणीनळाद्वारे पाणी पुरवठा आणि ग्रामीण व शहरी भागातील पायाभूत सुविधा उभारणेयासारख्या मूलभूत सेवांचा लाभ देणेया संकल्पना जगाला समजून घ्यायच्या आहेत,” असे त्यांनी सांगितले.

मंत्र्यांनी पुढे सांगितले कीजागतिक आर्थिक मंचात समावेशक विकाससामाजिकभौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक तसेच तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण यावर या मंचावर सविस्तर चर्चा होईल.

भारताचा डिजिटल क्रांतीचा ठसा

जागतिक आर्थिक मंच 2025 साठी दावोसला रवाना होण्यापूर्वी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या डिजिटल परिवर्तनाने जागतिक पातळीवर उत्सुकता निर्माण केली असल्याचे सांगितले.

भारताच्या आर्थिक धोरणांवरडिजिटल इंडिया कार्यक्रमाने घडवलेल्या बदलांवर आणि तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करण्याच्या उपक्रमांवर जगाचे लक्ष केंद्रित आहे,” असे मंत्री म्हणाले.

डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत विकसित केलेली भारताची नाविन्यपूर्ण डिजिटल संरचना समावेशक विकास साधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येतोयाचे जागतिक प्रमाण ठरली आहे.

जागतिक आर्थिक मंच 2025 मधील भारताचा सहभाग हा भागीदारी बळकट करणेगुंतवणूक आकर्षित करणे आणि शाश्वत विकास व तांत्रिक नावीन्यतेत जागतिक नेतृत्व म्हणून भारताची प्रतिमा उंचावण्यावर भर देईल.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .