भूमी इंटरप्रायजेस तर्फे जिल्हा परिषद शाळा, पाचगणी येथे विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कीट वाटप.
भूमी इंटरप्रायजेस तर्फे जिल्हा परिषद शाळा, पाचगणी येथे विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कीट वाटप.
शिराळा - प्रतिनिधी.
जिल्हा परिषद शाळा पाचगणी येथे भूमी इंटरप्रायजेस चे प्रतिनिधी सन्माननीय सिद्धराम वाघमारे व त्यांचे कुटुंबीय यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कीट वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सौ. दिपाली संदीप पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय वाघमारे ,सौ.सुशीला वाघमारे, संदीप वाघमारे , उपसरपंच संतोष पाटील ,कृष्णा कांबळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, सिध्दीविनायक चव्हाण उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ,सुभाष चव्हाण ,प्रकाश पाटील, आबासो मोरे, संदीप पाटील, निवृत्ती पाटील ग्रामपंचायत माजी सदस्य , अशोक चव्हाण , से.सो. व्हाईस चेअरमन ,.आनंदा पाटील, माजी पोलीस पाटील ,मच्छिंद्र पाटील सेवानिवृत्त पोलीस , अमोल इनामदार , सौ.पुष्पा भिंगरदेवे , सौ.शर्मिला इनामदार ,सौ. शारदा पाटील ग्रा.प. सदस्या , राहुल कांबळे , शंकर चव्हाण उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनासाठी नियमित शारीरिक व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना खेळांसाठी लागणारे टी शर्ट आणि पँट किट वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा आनंद होता आणि त्यांच्या खेळाविषयीच्या उत्साहाला चालना मिळाली.शाळेच्या शिक्षकांनी सिद्धराम वाघमारे सरांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार मानले आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सन्माननीय काळबांडे सर यांनी केले आणि हूमने सर उपस्थित होते ,तर विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त करून वाघमारे सरांना धन्यवाद दिले. उपस्थित पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.




Comments
Post a Comment