वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये बालिका दिन उत्साहात संपन्न.

 वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये बालिका दिन उत्साहात संपन्न.


शिराळा - प्रतिनिधी.

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए. सी. सदावर्ते सर होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून सविता देसाई व अनिता कांबळे उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ए आर पाटील मॅडम यांनी केले.प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्या  सविता देसाई व अनिता कांबळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.याप्रसंगी विद्यालयातील इ.५वी ते ९ वी विद्यार्थी -विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी भाषणे केली. इ.५ वीतील विद्यार्थिनी कु .श्रद्धा शिवाजी पांढरबळे हिने सावित्रीबाई फुले विषयी उत्कृष्ट चारोळ्या सादर केल्या.सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. 

तसेच विद्यालयातील शिक्षिका एस. एस.  जाधव मॅडम यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट मांडला.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. ए. सी. सदावर्ते सर यांनी महिला मुक्ती दिन, बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आजही महिलांनी विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारी घ्यावी तसेच त्यांच्या जीवन समस्या सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .