कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाची विविध ठिकाणांना भेटी.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाची विविध ठिकाणांना भेटी.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच अभ्यासक्रमातील इतर प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे व अभ्यासक्रमामध्ये अधिक ज्ञान तसेच आवड निर्माण होण्याकरिता प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची विविध ठिकाणांच्या क्षेत्र भेटींचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हॉस्पिटल भेट,जलशुद्धीकरण प्रकल्प भेट तसेच आयुर्वेदिक फार्मसी भेट, ड्रग डिस्ट्रीब्यूटर व फार्मसी भेट अशा भेटींचे आयोजन करण्यात आले होते. फार्मसी मधील सोशल फार्मसी, फार्माकोगन्सोसी, हॉस्पिटल फार्मसी आणि कम्युनिटी फार्मसीच्या अभ्यासक्रमांतर्गत या भेटी देण्यात आल्या होत्या.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्स इनचार्ज प्रा. पूजा भोसले, प्रा. प्रियांका आलेकरी, प्रा. प्रियांका माळी व प्रा. अरुणा परीट यांनी या भेटींचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामीण रुग्णालय उंडाळे, जय भवानी मेडिकल उंडाळे, सुमन आयुर्वेदिक्स, सुमन मेडिकल, राहुल डिस्ट्रीब्यूटर्स आणि जलशुद्धीकरण केंद्र मलकापूर, मेडिसिनल गार्डन यशवंतराव चव्हाण कॉलेज कराड या ठिकाणांचेही प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांकरता भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

Comments
Post a Comment