महिला महाविद्यालय कराड मधील विद्यार्थिनींची क्रीडा स्पर्धेसाठी निवड.
महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड.
कराड - प्रतिनिधी.
महिला महाविद्यालय, कराड मधील कु. श्रुतिका जाधव व कु. साजिया चौधरी यांची सेंट्रल यूनिवर्सिटी, काश्मीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली. या निवडीबद्दल शिक्षण मंडळ, कराडचे पदाधिकारी श्री. बाळासाहेब कुलकर्णी,श्री. चंद्रशेखर देशपांडे,श्री. राजेंद्र लाटकर ,श्रीमती. अनघा परांडकर, प्र. प्राचार्य प्रो. डॉ. स्नेहल प्रभुणे, उपप्राचार्य डॉ. पराग सोनटक्के इतर सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना स्पर्धेसाठी शारीरिक शिक्षण संचालक प्रा. स्मिता जगताप - सावंत व प्रा. प्रवीण बिरमुळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments
Post a Comment