डॉ. विनायक धुळप यांना पुरस्कार.
डॉ. विनायक धुळप यांना पुरस्कार.
सोलापूर - प्रतिनिधी.
डॉ. विनायक धुळप, संचालक, भूशास्त्र संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, यांना "National Level Best Academic Excellence Award - Lifetime Achievement" या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
हा सन्मान डॉ. धुळप यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा गौरव नसून त्यांच्या अथक परिश्रम, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांसाठी असलेल्या समर्पणाची साक्ष देतो. त्यांच्या कार्याने सोलापूर विद्यापीठाचा गौरव वाढवला आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.
त्यांनी हा पुरस्कार आपल्या शिक्षक, विद्यार्थी, आणि कुटुंबीयांना समर्पित करून आपली नम्रता आणि त्यांच्यावर असलेला विश्वास दर्शवला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्यासह सर्व सहकाऱ्यांकडून मिळालेले अभिनंदन हे त्यांच्या नेतृत्वाला दखल देणारे आहे. या त्यांच्या यशाबद्दल समाजातून त्यांच कौतुक होतंय.

Comments
Post a Comment