वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

 वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

शिराळा - प्रतिनिधी.

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद सदावर्ते सर हे होते तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका , शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता बारावीतील विद्यार्थिनी कृष्णाली बुगड हिने केले.या कार्यक्रमास प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ  देऊन स्वागत हर्षद सूर्यवंशी यांने केले तर इतर शिक्षकांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन शुभम शेरखाने ,कृष्णाली बुगड  अस्मिता माने यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता बारावीतील कुमारी वैभवी नाईक मोनिका देसाई मनस्वी मोरे अस्मिता माने शुभम शेरखाने इत्यादींनी आपली मनोगत व्यक्त केली प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमध्ये प्रथम दिवसापासून विद्यालयाने केलेली संस्कार , केलेले मार्गदर्शन आयुष्यभर उपयोगी पडतील असे सांगितले.याप्रसंगी डी एस सांडगे मॅडम, एस बी दिवे मॅडम, यांनी मनोगतात  बोर्ड परीक्षा व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.तर बी एम नलवडे सर यांनी विद्यार्थ्यांना  विज्ञान व तंत्रज्ञान युगात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी नवे मार्ग व दिशांनी वाटचाल करावी तसेच व्यावसायिक शिक्षण, स्पर्धा परीक्षा, यात उज्ज्वल यश संपादन करावे. जिद्द, चिकाटी, मेहनत याद्वारे कोणतीही गोष्ट साध्य होते.असे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष ए सी सदावर्ते सर यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना ताणतणाव विरहित परीक्षेला सामोरे जा असे सांगितले तसेच स्पर्धात्मक युगामध्ये जिद्द कष्ट मेहनत या सूत्रीचा वापर करा. असे सांगितले आपले आई-वडिलांचे नावलौकिक वाढवावा शाळेचा नावलौकिक वाढवा, असे सांगितले विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम नागरिक बनावे असे उपदेश दिला.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इयत्ता बारावीतील मनस्वी मोरे या विद्यार्थिनींने केले.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .