कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम उत्साहात संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम उत्साहात संपन्न.

उंडाळे -प्रतिनिधी.

श्री. संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, पुणे यांच्या निर्देशनानुसार वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महाविद्यालय व ग्रंथालयाची स्वच्छता करून ग्रंथालयामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये कथा, कादंबरी, मासिके, संदर्भ ग्रंथ, दुर्मिळ लेख अशा अवांतरीत वाचन साहित्याचा समावेश करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार निवडलेल्या पुस्तकांचे सामुहिक वाचन करण्यात आले.तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या समवेत करण्यात आले.यावेळी त्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमातील पाठ्य पुस्तकाप्रमाणेच इतर अवांतरित वाचन साहित्याचे फायदे किती आहेत ते सांगून प्रत्येकाने  दररोज किमान एक पान तरी वाचावे असे आवाहन केले.या कार्यक्रमावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी  अवांतरित साहित्यातील दररोज किमान एक तरी पान वाचण्याचा संकल्प केला.या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल दिलीप रवलेकर व प्रा. जयश्री जगदाळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .