स्नेहसंमेलन पर्व तिसरे.

 स्नेहसंमेलन पर्व तिसरे.

            


            S.S.C.  बॅच 19-95/96.

गेट टूगेदर म्हणजे केवळ एकत्र जमण्याचा प्रसंग नसून आपल्या स्नेह बंधाना अधिक घट्ट करणारा व गोड आठवणीच्या गाठी बांधणारा एक सुंदर सोहळा आहे.  19 जानेवारी हा दिवस आपल्यासाठी खास आहे. कारण गेल्या दोन्ही गेट टू गेदर पेक्षा जास्त सुख देऊन गेला. शाळेत गेल्यावर मला असे जाणवले शाळेत गेल्या-गेल्या बाकावर बसल्यावर आपली एकता आणि मित्रता पुन्हा नव्याने ताजीतवानी झाली. 

जणू काही मैत्रीच्या नात्याचा उत्सव आहे. रोजच्या घाई गडबडीत हरवून गेलेल्या गोष्टीना पुन्हा नव्याने उजाळा मिळाला. 19 जानेवारी हा जीवनातील छोटासा क्षण आपल्याला मोठ्या आठवणीं देऊन गेला. गेट टूगेदर मुळे आपली स्नेहाची भावना अजूनही अधिक वाढत आहे. आपली मित्र मंडळी कुटुंबातील सदस्य सर्वजण एकत्र आलेले पाहून मन खूप आनंदी झाले. "जीवनातील आनंदाचे क्षण हे आपुलकीच्या लोकांसोबत सापडतात. कारण आपले नाते हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहे."

गेट-टुगेदर म्हणजे फक्त एक कार्यक्रम नाही, तर आपापसात जिव्हाळ्याचे बंध घट्ट करणारा एक सोहळा आहे. आपल्या कामाच्या व्यापात आपण अनेकदा नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी संवाद साधू शकत नाही. पण असे कार्यक्रम आपल्याला एकत्र येऊन गप्पा मारण्याची, आठवणींना उजाळा देण्याची आणि एकमेकांच्या सोबत वेळ घालवण्याची संधी देतात.

आजच्या या क्षणांमध्ये आपल्याला जुन्या आठवणींना उजाळा मिळाला व नव्या आठवणी तयार करूया आणि नातेबंध अधिक मजबूत करूया. हसण्या-खेळण्यात, गाण्यात, खाण्यात आणि हास्यात हा दिवस लक्षात राहणार 

असे कार्यक्रम आपल्या जीवनाला नवसंजीवनी देतात. त्यातून आपल्याला नवा उत्साह आणि ऊर्जाही मिळते. म्हणूनच,अशा गेट-टुगेदरच्या माध्यमातून आपण आपले नाते आणखी घट्ट होईल ही आशा बाळगतो.  तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब व होतकरू विध्यार्थी संगणकीय ज्ञान मिळावे हा प्रांजल हेतू डोळ्यासमोर ठेऊन दादासाहेब उंडाळकर विद्यालयास  सन 19-95/96 च्या बॅच मधील मुला मुलींनी मिळून शाळेस संगणक भेट दिला व जे कोणी गरीब विध्यार्थी आहेत. त्यास आर्थिक मदत करण्याचे अश्वासन प्राचार्य बी. आर. पाटील सर यांना दिले.

शेवटी, आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम करणाऱ्या सर्व उनाड आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो.आपल्याला सगळ्यांना आनंदी क्षण अनुभवता यावेत, यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आहे, ती नक्कीच कौतुकास्पद आहे.आपण सर्वांनी भरपूर मजा केली खूप , हसलो, आणि हा दिवस अविस्मरणीय बनला. आजच्या या गेट-टुगेदरच्या आनंदी प्रसंगी  आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून आपण येथे एकत्र आलात, यासाठी आपणा सर्वांचे खूप आभार. 

   

                                 _____शकूर मुल्ला.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .