मकर संक्रांतीनिमित्त हळदी- कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात सपन्न.
मकर संक्रांतीनिमित्त हळदी- कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात सपन्न.
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे कडून महिलांना वान व दिनदर्शिका भेट.
कराड - प्रतिनिधी.
कोयना वसाहत ग्रामपंचायत, कोयना को ऑपरेटिव्ह टेनंट ओनरशिप हाउसिंग सोसायटी व जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभ कोयना वसाहत मधील कोटणीस हॉल मध्ये सपन्न झाला. यावेळी 500 महिलांनी उपस्थिती दर्शवली.
कोयना वसाहत मधील 500 महिलांच्या उपस्थितीत हळदी- कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचेकडून महिलांना वान व दिनदर्शिका भेट देण्यात आली. महिलांच्या सक्षमीकारणासाठी कोयना वसाहत मधील सरपंच उपसरपंच व महिलांच्याकडून वर्षभर विविध प्रकारचे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. हे उपक्रम घेण्यासाठी कोयना वसाहत ग्रामपंचायत, कोयना को ऑपरेटिव्ह टेनंट ओनरशिप हाउसिंग सोसायटीचे पदाधिकारी, कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.
नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचा, हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. महिला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करतात. मकर संक्रांतीत हळदी कुंकूवाचा सण का साजरा करतात. पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो.
यावेळी कोयना वसाहतीच्या सरपंच श्रीमती सुवर्णा राजेंद्र वळीव, श्रीमती संगीता सुर्यकांत पाटील, माजी सरपंच सौ. रजनीताई गुरव, सौ. सीमा पाटील, एन. पी फिश उद्योग समूहाच्या सौ. स्नेहल सुनिल पाटील, सौ. स्नेहल सत्यवान पाटील, मा. सरपंच सुनिता भोसले, श्रीमती कुसुम पुजारी, सौ. शितल जाधव, सौ. जयश्री मिसाळ, भाजपा महिला मोर्चाच्या सातारा जिल्हा सदस्या सौ. दैवशिला मोहिते, सौ. विभूते मॅडम, सौ.विद्या लखापती, सौ.ज्योती जकाते, श्रीमती पुष्पलता कदम, सौ. रिद्दी कुलकर्णी आदी महिलांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोयना को ऑपरेटिव्ह टेनंट ओनरशिप हाउसिंग सोसायटी चेअरमन श्री. चंद्रशेखर पाटील, कोयना वसाहतीचे उपसरपंच उमेश कुलकर्णी, कृष्णा नारीशक्ती सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा सौ. मनिषा सुनिल पवार व सर्व सदंस्य यांनी सहकार्य केले. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे शाखा कराडचे व्यवस्थाप श्री. सागर सुतार, श्री. रोहित केवट, कर्मचारी वर्ग यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले.

Comments
Post a Comment