भारताला आर्थिक महासत्तेकडे नेण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा -प्रा. श्री.अनिल सुतार
भारताला आर्थिक महासत्तेकडे नेण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा -प्रा. श्री.अनिल सुतार
कराड -प्रतिनिधी.
बाळासाहेब देसाई फौडेशन संचलित श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर (मरळी) व अग्रणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिप्टो चलन आणि डिजिटल रुपया या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा वाणिज्य विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे अर्थशास्त्र विभागतील प्रा. श्री. अनिल सुतार हे होते. तसेच या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. वैभव कांबळे सर होते.
यावेळी प्रा. श्री. अनिल सुतार म्हणाले की, क्रिप्टो चलन आणि डिजिटल रुपया हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, यामध्ये त्यांनी आभासी चलन संकल्पना, आभासी चलनाचा इतिहास, वैशिष्ट्ये, आभासी चलनाचे धोके, डिजिटल रुपया संकल्पना, वैशिष्ठ्ये, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी डिजिटल रुपयाचे फायदे, या नवीन संकल्पनाची माहिती घेणे आजच्या काळात गरजेचे आहे यासाठी आजच्या युवकांनी भारताला आर्थिक महासत्तेकडे नेण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. कु. देसाई के. पी यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. कु. पाटील टी.ए यांनी व आभार प्रा.श्री. पवार के. यु. यांनी केले. कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments
Post a Comment