भारतीय दलित महासंघ यांच्या वतीने शिराळा पोलिसांना निवेदन.
भारतीय दलित महासंघ यांच्या वतीने शिराळा पोलिसांना निवेदन.
शिराळा - प्रतिनिधी.
भारतीय दलित महासंघ यांच्या वतीने शिराळा पोलिसांना निवेदन देण्यात आले.
वयस्कर आदिवासी महिलेवर अघोरी अत्याचार करणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध.भारतीय दलित महासंघातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे व पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात यांच्याकडे निवेदनाची प्रत सादर करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की,रेट्याखेडा , ता .चिखलदरा . जि. अमरावती या ठिकाणी जादू टोण्याच्या संशयावरून एका 77 वर्षीय आदिवासी महिलेला मारहाण करून ; चटके देऊन , मूत्रपाजून तिला गावातून हाकलून देणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध .
सदरची घटना अतिशय निंदनीय ' मानवतेला काळीमा फासणारी आहे . सदरच्या अघोरी छळामुळे आदिवासी बांधवांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . शासनाने सदरच्या घटनेची संवेदनशीलरित्या दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित जातीयवादी नराधमांच्यावर ॲट्रॉसिटी,अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व भारतीय न्यायसंहितेच्या अनुषंगाने तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी . सदरच्या घटनेची दखल न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी . स्त्री जातीची अघोरी विटंबना करणाऱ्या गंभीर प्रकरणाची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर दयानंद शिवजातक,विनोद आढाव, रोहित महिंद, मारुती सातपुते,अमोल बडेकर,धनाजी तुपारे, शुभम साखरे,निलदीप कांबळे, शशिकांत कांबळे, विनोद कांबळे यांच्या सह्या आहेत.

Comments
Post a Comment