यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने  सॅनिटायझरचे वाटप.

" कोरोना ला प्रतिबंध घालण्यासाठी कारखान्याने केली स्वतः  सॅनिटायझर निर्मिती "

साळशिरंबे -( प्रतिनिधी )

कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.याच पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेशरावजी भोसले(बाबा) व संचालक मंडळ यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत सॅनिटायझर निर्मिती सुरू केली व आपल्या कार्यक्षेत्रात  शेतकरी, सभासद व नागरिकांना मोफत  सॅनिटायझरच वाटप केलं.
   याच पार्श्वभूमीवर मा.डॉ.सुरेशजी भोसले (बाबा) चेअरमन य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने, साळशिरंबे गावातील सभासद व शेतकरी यांना मोफत सैनिटाइजर वाटप करण्यात आले. 
       यावेळी भाजपा युवा मोर्चा कराड तालुकाध्यक्ष श्री.पंकज पाटील, माजी उपसरपंच श्री.वसंत मोहिते, कृष्णा कारखाना चिटबॉय श्री.गणेश पाटील, वि.का.स.सेवा सोसायटी सदस्य श्री.वासुदेव पाटील, श्री.जयकर पाटील, श्री हणमंत यादव ,जगन्नाथ पाटील  इ.उपस्थित होते. 
साळशिरंबे - सॅनिटायझरचे वाटप करताना भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पंकज पाटील ,  व गणेश पाटील. 

Comments

  1. कोरोना व्हायरस जागतिक महामारीच्या आणीबाणीप्रसंगी कृष्णा उद्योग समूह, जयवंत शुगर , यांच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याबद्दल भोसले कुटुंबीयांच आभार.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .