Posts

Showing posts from March, 2022

कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.

Image
  कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्याचा  राज्य मंत्रिमंडळाचा  निर्णय. मुंबई - दि.३१ मार्च तब्बल दोन वर्षांपासून लागू करण्यात आलेले कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.  हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, 'आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले. गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा रमजान उत्सहात साजरा करा बाबासाहेबांच्या मिरवणुका जोरात काढा.' एक एप्रिलपासून कोरोनाचे मास्क वगळता सर्व निर्णय मागे घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या होत्या. त्यामुळे राज्यात काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले होते. आता राज्य सरकारनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून राज्यात कोरोनासंबंधीचे कोणतेही नियम लागू राहणार नाहीत.

समाज माध्यमावरील जिल्हाधिकाऱी यांची धान्य वाटपाबाबतची ध्वनीचित्रफीत जुनी सद्यस्थितीत त्यातील घोषणा गृहीत धरण्यात येवू नये.

Image
  समाज माध्यमावरील जिल्हाधिकाऱी यांची धान्य वाटपाबाबतची ध्वनीचित्रफीत जुनी सद्यस्थितीत त्यातील घोषणा गृहीत धरण्यात येवू नये.                   -- जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते.   सातारा दि. 31:  सध्या व्हॉटस् अँप, फेस बुक अशा  विविध समाज माध्यमांमध्ये कोरोना 19 (कोव्हिड) काळातील म्हणजेच मार्च 2020 या कालावधीतील   जिल्हाधिकारी   सातारा यांची धान्यवाटपाबाबतची जुनी ध्वनीचित्रफितीचा प्रसार होत आहे. ही ध्वनीचित्रफीत  जुनी असल्यामुळे सद्यस्थितीत त्यातील घोषणा गृहीत धरणेत येऊ नये असे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   ही ध्वनी चित्रफीत   जुनी असून त्या अनुषंगाने खालील प्रमाणे त्यातील घोषणेबाबत स्पष्टीकरण देण्यात येत आहे.   या ध्वनी चित्रफितीमध्ये  केशरी शिधापत्रिका धारक( प्राधान्य कुंटूब योजना कार्डधारक )  यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत प्रति व्यक्ती प्रति माह  2 किलो तांदुळ व 3 किलो ग...

डॉ.अतुल भोसले (बाबा )यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद शाळेमध्ये खाऊवाटप.

Image
 डॉ.अतुल भोसले (बाबा )यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद शाळेमध्ये खाऊवाटप. कार्वे प्रतिनिधी :-  डॉ.अतुल भोसले बाबा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुळेवाडी येथील मतिमंद मुलांची निवासी शाळा, जुळेवाडी (रेठरे कारखाना) ता. कराड या शाळेमध्ये मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी राहुल पाटील, रोहित कापूरकर, अमोल जाधव, दामू सावंत, कपिल पाटील, शांताराम सूर्यवंशी व ऋषी कुंभार इत्यादी उपस्थित होते.

मुंबईसेंट्रल रेल्वेटर्मिनसला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंनी केली राज्यसभेत मागणी.

Image
  मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केली राज्यसभेत मागणी. मुंबई दि.31-   भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस ला  देण्यात यावे या आंबेडकरी जनतेच्या मागणीचा पुनरुच्चार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी राज्यसभेत केला.  महाराष्ट्राला रेल्वे खात्याचे  राज्यमंत्री पद लाभले आहे. मात्र महाराष्ट्राच्या रेल्वे बाबत च्या समस्या सोडविण्यासाठी भरीव निधी देण्यात यावा. मुंबईत नवीन 2 लोकल रेल्वे चे ट्रॅक सुरू करावेत.नवीन रेल्वे मार्ग सुरू कराव्यात अशा अनेक मागण्या संसदेत ना.रामदास आठवले यांनी केल्या.रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे काम चांगले असल्याचे कौतुक ही नारामदास आठवले यांनी केले. केंद्रीय कामगार मंत्री म्हणून भुपेंद्र यादव यांचे काम चांगले आहे. मात्र देशात सफाई कामगारांच्या अडचणी सोडविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.सफाईचे काम नियमित आणि नित्याची गरज असते.त्यामुळे  सफाई ...

इन्स्पायर पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांच्या उपकरणाची राष्ट्रीय पातळीवर निवड.

Image
  इन्स्पायर पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांच्या उपकरणाची राष्ट्रीय पातळीवर निवड. दिल्ली येथे राष्ट्रस्तर प्रदर्शनासाठी निवड : शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांची माहिती कार्वे प्रतिनिधी :- ( प्रविण पाटील) केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत 'इन्स्पायर' अवॉर्डसाठी सातारा जिल्ह्यातील ३ उपकरणांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. यात सातारा जिल्ह्यातील विज्ञान आधारित तीन उपकरणांचा समावेश आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देण्यासाठी व उत्कृष्ट शास्त्रज्ञनिर्मितीसाठी अशी निवड ही पहिली पायरी समजली जाते. सातारा जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याने शिक्षण विभागाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. राज्य सरकारच्या www.inspire.award.in या संकेतस्थळावर नावनोंदणी केल्यानंतर त्यातील उत्कृष्ट प्रोजेक्ट निवडले जातात. त्यांना जिल्हा स्तरावर प्रदर्शनात सादरीकरणाची संधी दिली जाते. यावर्षी राज्यातून निवडलेल्या विविध प्रोजेक्टपैकी सातारा जिल्ह्याने बाजी मारत ३ विद्यार्थ्यांच्या विज्ञान आधारित प्रकल्पांची निवड झाली. विविध जिल्ह्यातील ३३१ प्रकल्पांची राज्य...

नांदगाव येथे ट्रक्टर व ट्रक मध्ये अपघात.

Image
  नांदगाव येथे ट्रक्टर  व  ट्रक मध्ये अपघात. उंडाळे - प्रतिनिधी.   नांदगाव ता.कराड येथील परटकी नावाच्या परिसरात रयत कारखान्यास ऊस वाहतुक करणारा ट्रक्टर व माल वाहतुक करण्या-या ट्रकमध्ये अपघात झाला असुन यामध्ये ट्रक्टर चालक  जखमी झाला आहे.

स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत आरोग्य शिबिर संपन्न.

Image
स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत आरोग्य शिबिर संपन्न. शिराळा - प्रतिनिधी.  वारणा विद्यालय व ज्युनिअर काँलेज, सागाव ता.शिराळा येथे मंगळवार दि.२९/०३/२०२२ रोजी लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हा परिषद सांगली व प्राथमिक आरोग्य केंद्र सागाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र सागाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले .यावेळी उपस्थित  मा. जि. प. सदस्या सौ. अश्विनीताई नाईक, मा. पं. स. सभापती सौ मनीषा गुरव व सौ वैशाली माने सागाव चे लोकनियुक्त सरपंच श्री तात्या पाटील, तालुका आरोग्य अधिकारी  डॉक्टर प्रवीण पाटील साहेब, प्राथमिक आरोग्य केंद्र सागाव वैद्यकीय अधिकारी श्री. डॉ. डी बी निर्मळे साहेब, श्री. डॉ. उत्तम शिंदे वारणा विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, , विस्तार अधिकारी श्री चिलवंत साहेब  ,श्री चौगुले साहेब, श्री चौगुले आबा ,  प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व आरोग्य कर्मचारी व आशाताई व मदतनीस यावेळी उपस्थित होते.     यावेळी ...

रेठरे बुद्रुकच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णा कापूरकर यांना सामाजिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान.

Image
  रेठरे बुद्रुकच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णा कापूरकर यांना सामाजिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान. कराड - प्रतिनिधी. बेळगाव कर्नाटक येथे आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.       रेठरे बुद्रुक च्या लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णा कापूरकर यांना बेळगाव यांच्यातर्फे सामाजिक व शैक्षणिक,निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर ,खासदार अमरसिंह पाटील,ब्रिगेडियर अरविंद घट्टी, राहुल आवाडे संचालक जवाहर सहकारी साखर कारखाना, नगराध्यक्ष अप्पासो देशमुख, माळशिरस राजू शिंगाडे, कोल्हापूर माजी महापौर रमेश हरिजन,यांच्या उपस्थितीत देण्यात आला

ज्योतिर्लिंग शेतकरी बचाव पॅनेल कडून एकच निर्धार: यंदा सोसायटी आपली.

Image
  ज्योतिर्लिंग शेतकरी बचाव पॅनेल कडून एकच निर्धार: यंदा सोसायटी आपली. पाटण - सागर पाटील. कोविड मुळे आपत्तीचा सामना करीत असताना शासनाने विविध निवडणुकांना स्थगिती दिली होती. अनेक विकास सेवा सोसायटी यांचा कालावधी दीड वर्षापूर्वी संपला असताना या निवडणुकाही लांबणीवर पडल्या होत्या.कोरोनाच्या दुसऱ्याला टप्प्यानंतर शासनाने अनेक व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू केले आहेत. त्यामुळे रखडलेल्या निवडणुकांची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. राजकीय दृष्ट्या समजल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे गावातील विकास सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक 2021- 2022 रणधुमाळी सुरू झाली आहे. ज्योतिर्लिंग शेतकरी बचाव पॅनेल कडून एकच निर्धार करत ढेबेवाडीतुन रॅली काढून मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या उपस्थितत शुक्रवारी 7 व सोमवारी 22 असे एकूण 29 अर्ज दाखल केले आहेत. उरलेले अर्ज 31 मार्च पर्यंत भरण्यात येतील असे शेतकरी बचाव पॅनल कडून सांगण्यात आले आहे. मंद्रुळकोळे गावातील मतदार एकत्र येत दहा वर्ष  विरोधकांकडे सत्ता असलेली मोडीत काढणार असा निर्धार शेतकरी बचाव पॅनेल कडून ग्रामदैवत जोतिबाचे दर्शन घेऊन करण्यात आले. ...

कमल ज्ञानदेव मोरे यांचे निधन.

Image
  कमल ज्ञानदेव मोरे यांचे निधन. कार्वे  - प्रतिनिधी. कोडोली ता. कराड येथील कमल ज्ञानदेव मोरे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी,नातवंडे असा मोठा एकत्रित परिवार आहे.   रक्षाविसर्जन सोमवार दिनांक २८ /०३/२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता कोडोली येथे होणार आहे.

कराड पंचायत समितीच्या स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत जिंती शाळेचा डंका.

Image
  कराड पंचायत समितीच्या स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत जिंती शाळेचा डंका. उंडाळे - प्रतिनिधी    जिंती, ता. कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने स्वच्छ व सुंदर शाळा ग्राम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. आयएसओ मानांकन पाठोपाठ स्वच्छ सुंदर शाळेच्या पुरस्कारामुळे तालुक्यात जिंती प्राथमिक शाळेचा डंका वाजला आहे. जिंती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्रीकांत कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील उपक्रमशील अभ्यासू शिक्षक यांच्यामुळे गेली काही वर्षांपासून शाळेची गुणवत्ता वाढवण्याच्या प्रयत्नाला पुरस्काराने मोहर उटली आहे. येथे इयत्ता 1ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग असून शाळेची एकूण पटसंख्या 104 एवढी आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ आणि शाळेचा सर्वांगीण विकास यासाठी सातत्याने झटणारे येथील शिक्षक तसेच ग्रामस्थानचे मोलाचे सहकार्य यामुळे  यश हे यश मिळाले आहे. हा शाळेचा सन्मान कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे,उपसभापती रमेश देशमुख,गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांचे हस्ते शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत कारंडे, सरपंच जयवंत शेव...

आकाशी चव्हाण हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.

Image
  आकाशी चव्हाण हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड. कोळे - प्रतिनधी .  परिक्षा तोंडावर असताना  २०१९ ला वडीलाचे आपघाती निधन झाले. तरीही तिने शिक्षणाची जिद्द अणि चिकाटी सोडली नाही. दुखः विसरून शिकण्याची जिद्द कायम ठेवली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची स्पर्धा परिक्षेला सामोरे ती गेली. नुकत्याच हाती आलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी तिने घातली. मुलीमध्ये राज्यात १२ व्या रॅंकनी पास झालेल्या कोळे ( ता. कराड ) येथील आकाशी अरूण चव्हाण या जिद्दी मुलीची कहाणी प्रेरणादायी ठरत आहे.   मुळचा कौंटूबीक शैक्षणिक वारसा असलेली आकाशी चव्हाण जिद्दी अणि मेहनती स्वभवाची आहे. संकटात मात कशी करायची ही तिने या राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत तिने दाखवून दिले. परिक्षा दोन महिने पुढे असताना २०१९ ला वडीलाचा आपघाती मृत्यु झाला. पितृक्षत्र हारपले. संपुर्ण कुंटूब दुखात गेले. आचानक आलेल्या संकटाला मात्र ती सामोरे गेली. डगमगली नाही. दुखातही तिची आई प्राथमीक शिक्षिका शोभा चव्हाण, बहीण पुनम चव्हाण, डॅा. तेजस्वी चव्हाण, भाऊ शंभुराज यांनी तिचा आत्मविश्वास वाढवला. स्पर्धेची तयारी करून घेतली....

माथाडी कामगारांचे भाग्यविधाते व आराध्यदैवत स्व. आमदार आण्णासाहेब पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त भावपुर्ण श्रध्दांजली .

Image
  माथाडी कामगारांचे भाग्यविधाते व आराध्यदैवत स्व. आमदार आण्णासाहेब पाटील यांना ४० व्या पुण्यतिथीनिमित्त मंद्रुळकोळे गावातील ग्रामस्थांनी  वाहिली  भावपुर्ण श्रध्दांजली . कराड - प्रतिनिधी. माथाडी कामगारांचे भाग्यविधाते व आराध्यदैवत स्व. आमदार  आण्णासाहेब पाटील यांना त्यांच्या मूळ गावी ४० व्या पुण्यतिथीनिमित्त सर्वप्रथम मंद्रुळकोळे गावातील ग्रामस्थांनी पुष्पहार अर्पण करून भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली. अखंड भारताच्या कामगार चळवळीत सर्वात बलाढ्य समजल्या जाणा-या ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ व संघटनेचे जन्मदाते, माथाडी कामगारच नव्हेतर त्यांच्या कुटुंबाचे आराध्यदैवत म्हणजे  स्व. आमदार आण्णासाहेब पाटील ! पिळदार मिशा आणि बलदंड देहयष्टी लाभलेले हे मनुष्यरुपी परमेश्वर आज आपल्यात नसले तरी त्यांनी जन्माला घातलेला कामगार संघटनारुपी वटवृक्ष माथाडींना सदैव एकसंघ राहण्याच्या मुलमंत्रासोबत सावली देत रहाणार आहे.माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देणारे माथाडी कामगारांचे भाग्यविधाते व आराध्यदैवत स्व. आमदार आण्णासाहेब पाटील यांना त्यांच्या ४० व्य...

काळगाव प्रिमीअर लिगमध्ये येळेवाडी फायटर संघ विजेता.

Image
  काळगाव प्रिमीअर लिगमध्ये येळेवाडी फायटर संघ विजेता. तळमावले/वार्ताहर मुंबई येथे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत काळगांव क्रिकेट क्लब काळगांव यांच्या वतीने काळगांव प्रीमिअर लीग पर्व 1 चे नवी मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये येळेवाडी फायटर संघ विजेता ठरला तर उपविजेतेपद राधिका इलेव्हन रामिष्टेवाडी ला मिळाले. काळगांव क्रिकेट क्लब काळगांव चे आधारस्तंभ सल्लागार संजय बापू आंब्रुळकर, सचिन आबा येळवे, अध्यक्ष गोपीदादा सुर्यवंशी, सचिव संदीप बावडेकर, खजिनदार दत्ता पवार, पाटण कमिटीतील सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या माध्यमातून नवी मुंबई येथे काळगांव प्रीमीअर लीग संपन्न झाले. पाटण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवा जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी येळेवाडी फायटर संघाचे मालक राम येळवे, सतीश येळवे, सचिन येळवे, आयकाॅन शंकर देसाई उपस्थित होते. या विजेत्या संघांना नवी मुंबईमधील समाजसेवक सुनीलदादा मस्कर, वांगव्हॅलीचे अध्यक्ष सुभाष बावडेकर, समाजसेवक काका येळवे, सचिन बावडेकर, मनसेचे सचिन भाऊ आचरे, जयवंत येळवे, दत्तात्रय येळवे, संतोष येळवे व अन्य मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या.

कु.कार्तिकी वीर हिचे नवोदय प्रवेश परीक्षेत उज्ज्वल यश.

Image
  कु.कार्तिकी वीर हिचे नवोदय प्रवेश परीक्षेत उज्ज्वल यश. उंडाळे - प्रतिनिधी. सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात   इयत्ता ५ वी मधील  नवोदय प्रवेश परीक्षेत कु.कार्तिकी शंकर वीर हीने उज्वल यश संपादित केले. तिची नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झाली  कु.कार्तिकी ही जिल्हा परीषद प्राथमिक शाळा तुळसण या  शाळेची विद्यार्थिनी आहे.या निवडीबद्दल तुळ सण गावचे सरपंच,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ,शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामकृष्ण थोरात सर, तुळसण शाळेचे सर्व शिक्षकवृंद, कु. कार्तिकीचे पालक,कु. कार्तिकीला मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक श्री.राजेंद्र चव्हाण सर यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

ज्येष्ठ रिपब्लिकन कार्यकर्ते दिवंगत जी एम मोरे यांच्या कुटुंबियांची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट.

Image
  ज्येष्ठ रिपब्लिकन कार्यकर्ते दिवंगत जी एम मोरे यांच्या कुटुंबियांची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट. मुंबई दि. 18 - रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ विजय मोरे यांचे वडील आणि ज्येष्ठ रिपब्लिकन आंबेडकरी अनुयायी जी एम मोरे यांचे नुकतेच वयाच्या वर्षी  निधन झाले. शोकाकुल मोरे परिवाराची सांत्वनपर भेट आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी कुर्ला काजूपाडा येथे घेतली. यावेळी शोकाकुल मोरे परिवार तसेच स्थानिक आमदार दिलीपमामा लांडे ; रिपाइंचे बापू प्रधान; सहदेव उर्फ साधू कटके;  योगिराज भोसले; प्रविण मोरे; हेमंत रणपिसे; बी डी सकपाळ; अनिल लोंढे; सुभाष गायकवाड; भाऊसाहेब मस्के; उमेश मराडे; सिद्धार्थ लोमटे;प्रितेश कांबळे;महेंद्र कांबळे; महेंद्र ओव्हाळ; हरीश गायकवाड; भगवान लोखंडे; विनेश ढोले; रवींद्र रोकडे; तुषार कांबळे; दिलीप लोमटे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.  दिवंगत जी एम मोरे हे रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. दिवंगत बी सी कांबळे यांच्या पक्षात त्यांनी ...

बहुजन सामाजिक विकास संस्था यांचा कराड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा.

Image
  बहुजन  सामाजिक विकास  संस्था  यांचा  कराड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा. कराड - प्रतिनिधी.  बहुजन  सामाजिक विकास  संस्थेतर्फे  कराड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा. विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मागण्यांचे निवेदन तहसीलदार कराड यांना देण्यात आल.

कोडोलीतील पंढरीनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये वही व पेन वाटप.

Image
  कोडोलीतील पंढरीनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये वही व पेन  वाटप. कार्वे प्रतिनिधी :- (प्रवीण पाटील) कोडोली ता.कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडोली मध्ये पंढरीनाथ पाटील (दादा) यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी मधील सर्व विद्यार्थ्यांना वही व पेनाचे वाटप करण्यात आले. पंढरीनाथ पाटील हे नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय असतात. आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. त्याचबरोबर त्यांनी  सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यावेळी  दत्तात्रय मोरे ,महादेव मोरे शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद इत्यादी उपस्थित होते.

दीक्षाभूमी कोकरूड येथे बौद्ध धम्म परिषद संपन्न.

Image
  दीक्षाभूमी कोकरूड येथे बौद्ध धम्म परिषद संपन्न. शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.  दीक्षाभूमी कोकरूड येथे 27 फेब्रुवारी रोजी बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली. या धम्म परिषदेस संपूर्ण शिराळा तालुका आणि सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील बौद्ध बहुजन बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आले सभागृहामध्ये बुद्धांच भव्यदिव्य पुतळा लावण्यात आला होता तर सभागृहाच्या समोर महामानवाच्या भव्य दिव्य अशा प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या त्या लक्ष वेधत होत्या.* या धम्म परिषदेस उद्घाटक म्हणून डॉ. प्रतापराव मधाळे हे उपस्थित होते. त्यांनी शिराळा तालुक्यामध्ये पि.टी. मधाळे साहेब आणि बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी व या तालुक्यातील धम्म कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये 1958 मध्ये झालेल्या धम्मदीक्षा कार्यक्रमाचा इतिहास आपल्या भाषणातून मांडला. धम्म परिषदेचे प्रस्ताविक राहुल कांबळे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी बौद्ध समन्वय समितीची भूमिका समजून सांगितली. बौद्ध समन्वय समितीच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या सर्व संघटनांना ए...

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगाव येथे व्यक्तिमत्व विकास व्याख्यानाचे आयोजन.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगाव येथे व्यक्तिमत्व विकास व्याख्यानाचे आयोजन. उंडाळे - प्रतिनिधी . श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी( डी फार्मसी ) घोगाव, या महाविद्यालयांमध्ये व्यक्तिमत्व विकास व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाचा मुख्य विषय सॉफ्ट  स्किल्स मॅनेजमेंट हा होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते डॉ. एस. व्ही. जवळकर सर ( प्राचार्य एस.डी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी इस्लामपूर) हे उपस्थित होते. त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली महाडीक मॅडम यांनी केले. जवळकर सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना स्वतःचे स्किल्स कसे विकसित करायचे, औषध निर्माता म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत, तुमचा सर्व सर्वांगिन विकास होण्यासाठी स्वतःचे ज्ञान कसे वाढवले पाहिजे तसेच शारीरिक व व्यक्तिगत विकास कसे वाढवावे त्याचे फायदे तसेच फार्मसी प्रोफेशनचे महत्व त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती पाटील मॅडम यांनी केले व प्रास्ताविक मोनिका चवरे मॅडम यांनी केले

श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,गोवे येथे मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन उत्साहात साजरा.

Image
  श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,गोवे येथे मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन उत्साहात साजरा. कराड - प्रतिनिधी. श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोवे येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,भाषण स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम विद्यालयात राबविण्यात आले होते.मराठी विषय शिक्षक श्री संजय बरकडे सर यांनी आपल्या व्याख्याणातून कुसुमाग्रज यांच्या कार्याची माहिती दिली तसेच श्री राजे सर ,  लक्ष्मण उबाळे सर यांनी मराठीतील निवडक कविता वाचन करुन विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व सांगितले.  राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यालयात वैज्ञानिक रांगोळी  ,प्रश्नमंजुषा ,व्याख्याणमाला तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वाटप करण्यात आले . विद्यालयाच्या प्राचार्या सौ.विभा साबळे मॅडम यांनी सी.व्ही.रामन यांच्या कार्याची  माहिती सांगितली तसेच या कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक श्री लक्ष्मण उबाळे, अजितकुमार टंकसाळे यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमास...

डिप्लोमा फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने मेडिसिन गार्डनला भेट.

Image
  डिप्लोमा फार्मसी  महाविद्यालयाच्या वतीने मेडिसिन गार्डनला भेट. कराड - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म ) घोगाव या महाविद्यालयाच्या वतीने  यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड येथे  मेडिसिनल गार्डनला भेट देण्यात आली.  विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी फार्माकोग्नसी हा विषय असतो या विषयातील  सर्व औषधी वनस्पती यांचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरीत्या माहिती असणे गरजेचे असते.  या विषयांमध्ये सर्व वनस्पती प्राणी इत्यादी पासून मिळणारे औषधी घटक व त्यांचा वापर शिकवला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांना या वनस्पतींची माहिती असणे गरजेचे असते यासाठी एक दिवसीय मेडिसिन गार्डनला भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना वाय. सी. कॉलेजचे प्राचार्य केंगार सर व  वनस्पती शास्त्रचे प्राध्यापक पोतदार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या भेटीवेळी प्रियंका आलेकरी मॅडम, सोनल सातपूते मॅडम या विद्यार्थ्यांच्या सोबत उपस्थित होत्या.

आनंद विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध.

Image
  आनंद विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध.   श्री  सुधीर शिवाजी लादे यांची चेअरमन पदी तर सौ.उर्मिला अजित थोरात यांची व्हाईस चेअरमन पदी निवड.     मलकापूर- प्रतिनिधी.    मलकापूर ता.कराड येथील सहकार क्षेत्रातील एक नामांकीत संस्था,मलकापूर संस्थेचे कार्यक्षेत्र  आदर्श ज्युनियर कॉलेज व आ.च. विद्यालय असून संस्थेची पंचवार्षिक निवडणूक,निवडणूक निर्णय अधिकारी श्री. एस.एस.सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.आनंद विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध...          यावेळी माजी चेअरमन श्री बी.जी.बुरुंगले यांनी नवनिर्वाचित चेअरमन श्री. सुधीर शिवाजी लादे    यांच्याकडे चेअरमनपदाची सूत्रे सोपवली. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांमधून व्हाईस चेअरमन म्हणून सौ.उर्मिला अजित थोरात .यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित संचालक म्हणून रामकृष्ण पाटील,रामचंद्र राठोड,राजेंद्र पांढरपट्टे ,सीमा खाडे ,वेदीका यादव, वैष्णवी सावंत,सोहम...

महाराष्ट्रभूषण थोर समाजसेवक डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन.

Image
  महाराष्ट्रभूषण थोर समाजसेवक डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन. कराड - प्रतिनिधी. महाराष्ट्रभूषण थोर समाजसेवक डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉक्टर  नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड व पद्मभूषण आदरणीय डॉ.  आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉ  सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे  सांगली जिल्ह्यामध्ये मंगळवारी दिनांक 1 मार्च 2022 रोजी विटा व इस्लामपूर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यात  इस्लामपूर येथे 125 व विटा  येथे 125 रक्तदात्यांनी या दोन्ही ठिकाणी रक्तदान करण्यात आले तसेच मिरज, जत, कवठेमंकाळ, पलूस, कडेगाव, आटपाडी, सांगली तासगाव , या तालुक्याच्या सर्व ठिकाणी   एकाच वेळी शासकीय कार्यालय,पोलीस स्टेशन,या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली  तसेच यावेळी 987 प्रतिष्ठान च्या श्री सदस्यांनी स्वयंशिस्तीने व शासनाच्या सर्व  नियमांचे पालन करून सहभाग नोंदवला तसेच रक्तपेढीची क्षमता इस्लामपूर 147 व विटा 152असल्य...