महाराष्ट्रभूषण थोर समाजसेवक डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन.
महाराष्ट्रभूषण थोर समाजसेवक डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन.
कराड - प्रतिनिधी.
महाराष्ट्रभूषण थोर समाजसेवक डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड व पद्मभूषण आदरणीय डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉ सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे सांगली जिल्ह्यामध्ये मंगळवारी दिनांक 1 मार्च 2022 रोजी विटा व इस्लामपूर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यात इस्लामपूर येथे 125 व विटा येथे 125 रक्तदात्यांनी या दोन्ही ठिकाणी रक्तदान करण्यात आले तसेच मिरज, जत, कवठेमंकाळ, पलूस, कडेगाव, आटपाडी, सांगली तासगाव , या तालुक्याच्या सर्व ठिकाणी एकाच वेळी शासकीय कार्यालय,पोलीस स्टेशन,या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली तसेच यावेळी 987 प्रतिष्ठान च्या श्री सदस्यांनी स्वयंशिस्तीने व शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सहभाग नोंदवला तसेच रक्तपेढीची क्षमता इस्लामपूर 147 व विटा 152असल्याने अनेक सदस्यांना रक्तदान न करता मागे जावे लागले. शिबिरासाठी मा.डॉ. संपत खिलारी साहेब उपविभागीय अधिकारी इस्लामपूर अजिंक्य कुंभार साहेब शिक्षणाधिकारी पंचायत समिती वाळवा बाबासो पवार चेअरमन जयंत नेत्रालय सिक्रेट ट्रस्ट इस्लामपूर याठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिरास सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली शिबिरामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड चे सदस्य उपस्थित होते या रक्तदान शिबिरास जयंत नेत्रालय हॉल इस्लामपूर या ठिकाणी प्रारंभ करण्यात आला. तसेच विटा येथे आमदार अनिल बाबर, श्री. सदाशिव पाटील, वैभव पाटील नगराध्यक्ष, सुहास बाबर यांनी रक्तदानामध्ये आपला सहभाग नोंदवला. तसेच नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील,नगरसेविका सारिका सपकाळ ,नगरसेवक अविनाश चोथे माजी आमदार सदाशिवराव पाटील, नगरसेवक किरण तारळे कर, ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्याय, पत्रकार गजानन बाबर, विनायक पवार, रमेश जाधव, अभिजित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment