कोडोलीतील पंढरीनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये वही व पेन वाटप.

 कोडोलीतील पंढरीनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये वही व पेन  वाटप.


कार्वे प्रतिनिधी :- (प्रवीण पाटील)

कोडोली ता.कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडोली मध्ये पंढरीनाथ पाटील (दादा) यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी मधील सर्व विद्यार्थ्यांना वही व पेनाचे वाटप करण्यात आले. पंढरीनाथ पाटील हे नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय असतात. आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. त्याचबरोबर त्यांनी  सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

यावेळी  दत्तात्रय मोरे ,महादेव मोरे शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .