कराड पंचायत समितीच्या स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत जिंती शाळेचा डंका.
कराड पंचायत समितीच्या स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत जिंती शाळेचा डंका.
जिंती, ता. कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने स्वच्छ व सुंदर शाळा ग्राम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. आयएसओ मानांकन पाठोपाठ स्वच्छ सुंदर शाळेच्या पुरस्कारामुळे तालुक्यात जिंती प्राथमिक शाळेचा डंका वाजला आहे.
जिंती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्रीकांत कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील उपक्रमशील अभ्यासू शिक्षक यांच्यामुळे गेली काही वर्षांपासून शाळेची गुणवत्ता वाढवण्याच्या प्रयत्नाला पुरस्काराने मोहर उटली आहे. येथे इयत्ता 1ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग असून शाळेची एकूण पटसंख्या 104 एवढी आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ आणि शाळेचा सर्वांगीण विकास यासाठी सातत्याने झटणारे येथील शिक्षक तसेच ग्रामस्थानचे मोलाचे सहकार्य यामुळे यश हे यश मिळाले आहे.
हा शाळेचा सन्मान कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे,उपसभापती रमेश देशमुख,गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांचे हस्ते शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत कारंडे, सरपंच जयवंत शेवाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, विनायक पाटील, श्रीकांत साळुंखे, लालासो पाटील, दिगंबर पाटील, घराळवाडी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र पाटील तसेच शाळेतील शिक्षिका सरिता कारंडे, वैशाली साळुंखे व उपशिक्षक मारुती जाधव, सुहास पाटील आदींनी स्वीकारला.
शाळा आयएसओ मानांकनसाठी पंचवीस हजार रुपये व स्वच्छ व सुंदर शाळा बनविणेसाठी पन्नास हजार रुपये असे एकूण पंचाहत्तर हजार रुपये लोकवर्गणीतून शाळेचे रुपडे पालटले आहे. शाळेची आकर्षक रंगरंगोटी, बोलक्या भिंती यामुळे येथील विद्यार्थी आनंदमय वातावरणात शिक्षणाचे धडे घेत आहेत. सध्या शाळेत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व भावनिक विकासासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. डिजिटल कलासरूमच्या साहाय्याने विद्यार्थ्याना शिक्षणाचे धडे देऊन विद्याथ्यार्ंना तंत्रस्नेही बनविण्याचे कामही केले जात आहे. ग्रामस्थांचे सहकार्य आणि हुशार अभ्यासू शिक्षक यामुळे दिवसेंदिवस शाळेचा नावलौकिक वाढत आहे. शाळेच्या या उत्तुंग भरारीसाठी कराड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, शिक्षणविस्ताराधिकारी जमीला मुलाणी व श्री कांबळे तसेच केंद्रप्रमुख सदाशिव आमने यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
-------------
शाळेत डिजिटल वर्ग ही संकल्पना राबविली जात आहे. विद्याथ्यार्ंना प्रभावीपणे शिक्षणाचे धडे मिळावेत तसेच तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या हेतूने शाळेत एलसीडी प्रोजेक्टरच्या साहाय्याने मार्गदर्शन केले जाते. कोरोना महामारीमध्येही प्रभावीपणे ऑनलाइन शिक्षण देण्यात आले आहे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धामध्ये केंद्र बिट व तालुकास्तरावर घवघवीत यश संपादन केले आहे,
-श्रीकांत कारंडे
मुख्याध्यापक
------------------------------

Comments
Post a Comment