आकाशी चव्हाण हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.

 

आकाशी चव्हाण हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.


कोळे - प्रतिनधी .

 परिक्षा तोंडावर असताना  २०१९ ला वडीलाचे आपघाती निधन झाले. तरीही तिने शिक्षणाची जिद्द अणि चिकाटी सोडली नाही. दुखः विसरून शिकण्याची जिद्द कायम ठेवली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची स्पर्धा परिक्षेला सामोरे ती गेली. नुकत्याच हाती आलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी तिने घातली. मुलीमध्ये राज्यात १२ व्या रॅंकनी पास झालेल्या कोळे ( ता. कराड ) येथील आकाशी अरूण चव्हाण या जिद्दी मुलीची कहाणी प्रेरणादायी ठरत आहे.

  मुळचा कौंटूबीक शैक्षणिक वारसा असलेली आकाशी चव्हाण जिद्दी अणि मेहनती स्वभवाची आहे. संकटात मात कशी करायची ही तिने या राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत तिने दाखवून दिले. परिक्षा दोन महिने पुढे असताना २०१९ ला वडीलाचा आपघाती मृत्यु झाला. पितृक्षत्र हारपले. संपुर्ण कुंटूब दुखात गेले. आचानक आलेल्या संकटाला मात्र ती सामोरे गेली. डगमगली नाही. दुखातही तिची आई प्राथमीक शिक्षिका शोभा चव्हाण, बहीण पुनम चव्हाण, डॅा. तेजस्वी चव्हाण, भाऊ शंभुराज यांनी तिचा आत्मविश्वास वाढवला. स्पर्धेची तयारी करून घेतली.  नुकत्याच हाती आलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी तिने घातली. मुलीमध्ये १२ व्या रँकने ती पास झाली आहे. निवड झालेल्या चव्हाण हिचे प्राथमीक शिक्षण आजोळी येरवळे येथे झाले आहे. माध्यमीक शिक्षण येथील आदर्श विद्यालयात घेतले आहे. कराडच्या सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. उच्चशिक्षण पुणेच्या सीओईपी कॅालेजला इंजनिअर पदवी प्राप्त करून स्पर्धा परिक्षा तिने दिली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या जाहीर झालेल्या निकालात पहिल्याच प्रयत्नात ती यशस्वी ठरली. मुलीमध्ये १२ रँकने पास झाली.कोळे गाव व परिसरातून तिच्या यशाबद्दल कौतुक होत आहे. येरवळे येथील आजोबा कै. रामचंद्र यादव व आजीचे मार्गदर्शन तिला वारंवार लाभले आहे. लहानपणी त्यांनीच संस्कार तिच्यावर घडवले. त्याची नावे ती आर्वजून घेते. फिजीकल फिटनेस सातारा येथे युवा अॅकाडमीत झाले असून विश्वार मोरे यांचे मार्गदर्शन तिला लाभले आहे.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .