रेठरे बुद्रुकच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णा कापूरकर यांना सामाजिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान.
रेठरे बुद्रुकच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णा कापूरकर यांना सामाजिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान.
कराड - प्रतिनिधी.
बेळगाव कर्नाटक येथे आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रेठरे बुद्रुक च्या लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णा कापूरकर यांना बेळगाव यांच्यातर्फे सामाजिक व शैक्षणिक,निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर ,खासदार अमरसिंह पाटील,ब्रिगेडियर अरविंद घट्टी, राहुल आवाडे संचालक जवाहर सहकारी साखर कारखाना, नगराध्यक्ष अप्पासो देशमुख, माळशिरस राजू शिंगाडे, कोल्हापूर माजी महापौर रमेश हरिजन,यांच्या उपस्थितीत देण्यात आला

Comments
Post a Comment