ज्योतिर्लिंग शेतकरी बचाव पॅनेल कडून एकच निर्धार: यंदा सोसायटी आपली.

 ज्योतिर्लिंग शेतकरी बचाव पॅनेल कडून एकच निर्धार: यंदा सोसायटी आपली.


पाटण - सागर पाटील.

कोविड मुळे आपत्तीचा सामना करीत असताना शासनाने विविध

निवडणुकांना स्थगिती दिली होती. अनेक विकास सेवा सोसायटी यांचा कालावधी दीड वर्षापूर्वी संपला असताना या निवडणुकाही लांबणीवर पडल्या होत्या.कोरोनाच्या दुसऱ्याला टप्प्यानंतर शासनाने अनेक व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू केले आहेत. त्यामुळे रखडलेल्या निवडणुकांची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. राजकीय दृष्ट्या समजल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे गावातील विकास सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक 2021- 2022 रणधुमाळी सुरू झाली आहे. ज्योतिर्लिंग शेतकरी बचाव पॅनेल कडून एकच निर्धार करत ढेबेवाडीतुन रॅली काढून मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या उपस्थितत शुक्रवारी 7 व सोमवारी 22 असे एकूण 29 अर्ज दाखल केले आहेत. उरलेले अर्ज 31 मार्च पर्यंत भरण्यात येतील असे शेतकरी बचाव पॅनल कडून सांगण्यात आले आहे. मंद्रुळकोळे गावातील मतदार एकत्र येत दहा वर्ष  विरोधकांकडे सत्ता असलेली मोडीत काढणार असा निर्धार शेतकरी बचाव पॅनेल कडून ग्रामदैवत जोतिबाचे दर्शन घेऊन करण्यात आले. शेतकरी बचाव पॅनेल ला गावातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. सोसायटी मिळवण्यासाठी शेतकरी बचाव पॅनेलने जोरदार तयारी केली असून यात अनेक स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शेतकरी बचाव पॅनेलने ही सोसायटी मिळवल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगतीचे साधन मानले जात आहे. सोसायटी निवडणुकांना मोठे महत्त्व वाढल्याने  सत्ताधारी स्थानिक नेते व पुढारी व कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून एकूणच सोसायटीच्या निवडणुकीत गावागावात राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने विकास सेवा सोसायटी संचालकांच्या ठरावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे . ज्योतिर्लिंग शेतकरी बचाव पॅनेल कडून एकच निर्धार करत गावातील लोकांचा पाठिंबा मिळवत यश संपादन करणार असे नागरिकांचे आपापसात विषय निघत आहेत.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .