डिप्लोमा फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने मेडिसिन गार्डनला भेट.
डिप्लोमा फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने मेडिसिन गार्डनला भेट.
कराड - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म ) घोगाव या महाविद्यालयाच्या वतीने यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड येथे मेडिसिनल गार्डनला भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी फार्माकोग्नसी हा विषय असतो
या विषयातील सर्व औषधी वनस्पती यांचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरीत्या माहिती असणे गरजेचे असते. या विषयांमध्ये सर्व वनस्पती प्राणी इत्यादी पासून मिळणारे औषधी घटक व त्यांचा वापर शिकवला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांना या वनस्पतींची माहिती असणे गरजेचे असते यासाठी एक दिवसीय मेडिसिन गार्डनला भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना वाय. सी. कॉलेजचे प्राचार्य केंगार सर व वनस्पती शास्त्रचे प्राध्यापक पोतदार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या भेटीवेळी प्रियंका आलेकरी मॅडम, सोनल सातपूते मॅडम या विद्यार्थ्यांच्या सोबत उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment