आनंद विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध.

 आनंद विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध.

  श्री  सुधीर शिवाजी लादे यांची चेअरमन पदी तर सौ.उर्मिला अजित थोरात यांची व्हाईस चेअरमन पदी निवड.
   

मलकापूर- प्रतिनिधी.

   मलकापूर ता.कराड येथील सहकार क्षेत्रातील एक नामांकीत संस्था,मलकापूर संस्थेचे कार्यक्षेत्र  आदर्श ज्युनियर कॉलेज व आ.च. विद्यालय असून संस्थेची पंचवार्षिक निवडणूक,निवडणूक निर्णय अधिकारी श्री. एस.एस.सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.आनंद विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध...

         यावेळी माजी चेअरमन श्री बी.जी.बुरुंगले यांनी नवनिर्वाचित चेअरमन श्री. सुधीर शिवाजी लादे    यांच्याकडे चेअरमनपदाची सूत्रे सोपवली. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांमधून व्हाईस चेअरमन म्हणून सौ.उर्मिला अजित थोरात .यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित संचालक म्हणून रामकृष्ण पाटील,रामचंद्र राठोड,राजेंद्र पांढरपट्टे ,सीमा खाडे ,वेदीका यादव, वैष्णवी सावंत,सोहम देसाई, आदित्य शिर्के, स्पंदन जाधव यांची निवड झाली. 

        श्री मळाईदेवी ग्रुपचे प्रमुख शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांनी नवनिर्वाचित सर्व संचालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

       कार्यक्रमास मलकापूर  नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री अजित(काका) थोरात, एस.वाय.गाडे,  ए. एन.शिर्के, ए.एस.कुंभार ,रमेश हिंगसे  पंडित शिर्के  उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.आर.देसाई यांनी केले,उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार ए.एन.शिर्के यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .