श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,गोवे येथे मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन उत्साहात साजरा.
श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,गोवे येथे मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन उत्साहात साजरा.
कराड - प्रतिनिधी.
श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोवे येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,भाषण स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम विद्यालयात राबविण्यात आले होते.मराठी विषय शिक्षक श्री संजय बरकडे सर यांनी आपल्या व्याख्याणातून कुसुमाग्रज यांच्या कार्याची माहिती दिली तसेच श्री राजे सर , लक्ष्मण उबाळे सर यांनी मराठीतील निवडक कविता वाचन करुन विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व सांगितले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यालयात वैज्ञानिक रांगोळी ,प्रश्नमंजुषा ,व्याख्याणमाला तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वाटप करण्यात आले . विद्यालयाच्या प्राचार्या सौ.विभा साबळे मॅडम यांनी सी.व्ही.रामन यांच्या कार्याची माहिती सांगितली तसेच या कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक श्री लक्ष्मण उबाळे, अजितकुमार टंकसाळे यांनी परीश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री नंदाभाऊजाधव,संचालक भुजंगराव जाधव , प्रकाश यादव,प्रभाकर गाडगीळ तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment