काळगाव प्रिमीअर लिगमध्ये येळेवाडी फायटर संघ विजेता.

 

काळगाव प्रिमीअर लिगमध्ये येळेवाडी फायटर संघ विजेता.


तळमावले/वार्ताहर

मुंबई येथे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत काळगांव क्रिकेट क्लब काळगांव यांच्या वतीने काळगांव प्रीमिअर लीग पर्व 1 चे नवी मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये येळेवाडी फायटर संघ विजेता ठरला तर उपविजेतेपद राधिका इलेव्हन रामिष्टेवाडी ला मिळाले.

काळगांव क्रिकेट क्लब काळगांव चे आधारस्तंभ सल्लागार संजय बापू आंब्रुळकर, सचिन आबा येळवे, अध्यक्ष गोपीदादा सुर्यवंशी, सचिव संदीप बावडेकर, खजिनदार दत्ता पवार, पाटण कमिटीतील सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या माध्यमातून नवी मुंबई येथे काळगांव प्रीमीअर लीग संपन्न झाले. पाटण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवा जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी येळेवाडी फायटर संघाचे मालक राम येळवे, सतीश येळवे, सचिन येळवे, आयकाॅन शंकर देसाई उपस्थित होते.

या विजेत्या संघांना नवी मुंबईमधील समाजसेवक सुनीलदादा मस्कर, वांगव्हॅलीचे अध्यक्ष सुभाष बावडेकर, समाजसेवक काका येळवे, सचिन बावडेकर, मनसेचे सचिन भाऊ आचरे, जयवंत येळवे, दत्तात्रय येळवे, संतोष येळवे व अन्य मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .