स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत आरोग्य शिबिर संपन्न.
स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत आरोग्य शिबिर संपन्न.
शिराळा - प्रतिनिधी.
वारणा विद्यालय व ज्युनिअर काँलेज, सागाव ता.शिराळा येथे मंगळवार दि.२९/०३/२०२२ रोजी लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हा परिषद सांगली व प्राथमिक आरोग्य केंद्र सागाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र सागाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले .यावेळी उपस्थित मा. जि. प. सदस्या सौ. अश्विनीताई नाईक, मा. पं. स. सभापती सौ मनीषा गुरव व सौ वैशाली माने सागाव चे लोकनियुक्त सरपंच श्री तात्या पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील साहेब, प्राथमिक आरोग्य केंद्र सागाव वैद्यकीय अधिकारी श्री. डॉ. डी बी निर्मळे साहेब, श्री. डॉ. उत्तम शिंदे वारणा विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, , विस्तार अधिकारी श्री चिलवंत साहेब ,श्री चौगुले साहेब, श्री चौगुले आबा , प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व आरोग्य कर्मचारी व आशाताई व मदतनीस यावेळी उपस्थित होते.
यावेळी आमच्या विद्यालयाच्या वतीने मा.मनिषा गुरव सभापती पंचायत समिती शिराळा यांचा सत्कार मा.अरूण पाटील सर यांनी केला.
आपल्या मनोगतात सभापती मँडम यांनी विद्यालयाचे कौतुक करताना ,मी या विद्यालयाची माजी विद्यार्थ्यांनी असल्याचा अभिमान वाटतो कारण या विद्यालयाने मला घडविले आहे, विद्यालयातील शिक्षकांच्या आशीर्वादाने मी आज पंचायत समितीच्या सभापती पदापर्यंत प्रयत्न पोहोचले.




Comments
Post a Comment