माथाडी कामगारांचे भाग्यविधाते व आराध्यदैवत स्व. आमदार आण्णासाहेब पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त भावपुर्ण श्रध्दांजली .

 माथाडी कामगारांचे भाग्यविधाते व आराध्यदैवत स्व. आमदार आण्णासाहेब पाटील यांना ४० व्या पुण्यतिथीनिमित्त मंद्रुळकोळे गावातील ग्रामस्थांनी  वाहिली  भावपुर्ण श्रध्दांजली .

कराड - प्रतिनिधी.

माथाडी कामगारांचे भाग्यविधाते व आराध्यदैवत स्व. आमदार  आण्णासाहेब पाटील यांना त्यांच्या मूळ गावी ४० व्या पुण्यतिथीनिमित्त सर्वप्रथम मंद्रुळकोळे गावातील ग्रामस्थांनी पुष्पहार अर्पण करून भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली.

अखंड भारताच्या कामगार चळवळीत सर्वात बलाढ्य समजल्या जाणा-या ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ व संघटनेचे जन्मदाते, माथाडी कामगारच नव्हेतर त्यांच्या कुटुंबाचे आराध्यदैवत म्हणजे  स्व. आमदार आण्णासाहेब पाटील ! पिळदार मिशा आणि बलदंड देहयष्टी लाभलेले हे मनुष्यरुपी परमेश्वर आज आपल्यात नसले तरी त्यांनी जन्माला घातलेला कामगार संघटनारुपी वटवृक्ष माथाडींना सदैव एकसंघ राहण्याच्या मुलमंत्रासोबत सावली देत रहाणार आहे.माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देणारे माथाडी कामगारांचे भाग्यविधाते व आराध्यदैवत स्व. आमदार आण्णासाहेब पाटील यांना त्यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित आण्णांच्या मुळ गावातील ग्रामस्थांनी पुष्पहार अर्पण करून  सर्व प्रथम भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.यावेळी युवा नेते रणजित पाटील,बळवंत पाटील,अशोकराव पाटील,सुरेश पाटील,मारुती गरुड,सतीश पाटील,विलास पाटील,रमण, पाटील,सागर पाटील,हिंदुराव पाटील,संपत यादव,सुधीर पाटील,जयवंत पाटील,दिलीप पाटील,सरदार पाटील,दादासो पाटील,व मंद्रुळकोळे गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .