ज्येष्ठ रिपब्लिकन कार्यकर्ते दिवंगत जी एम मोरे यांच्या कुटुंबियांची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट.


 ज्येष्ठ रिपब्लिकन कार्यकर्ते दिवंगत जी एम मोरे यांच्या कुटुंबियांची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट.

मुंबई दि. 18 - रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ विजय मोरे यांचे वडील आणि ज्येष्ठ रिपब्लिकन आंबेडकरी अनुयायी जी एम मोरे यांचे नुकतेच वयाच्या वर्षी  निधन झाले. शोकाकुल मोरे परिवाराची सांत्वनपर भेट आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी कुर्ला काजूपाडा येथे घेतली. यावेळी शोकाकुल मोरे परिवार तसेच स्थानिक आमदार दिलीपमामा लांडे ; रिपाइंचे बापू प्रधान; सहदेव उर्फ साधू कटके;  योगिराज भोसले; प्रविण मोरे; हेमंत रणपिसे; बी डी सकपाळ; अनिल लोंढे; सुभाष गायकवाड; भाऊसाहेब मस्के; उमेश मराडे; सिद्धार्थ लोमटे;प्रितेश कांबळे;महेंद्र कांबळे; महेंद्र ओव्हाळ; हरीश गायकवाड; भगवान लोखंडे; विनेश ढोले; रवींद्र रोकडे; तुषार कांबळे; दिलीप लोमटे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 


दिवंगत जी एम मोरे हे रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. दिवंगत बी सी कांबळे यांच्या पक्षात त्यांनी काम केले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीत त्यांनी आयुष्यभर काम केले नंतर च्या काळात रिपब्लिकन चळवळ देशभर घेऊन जाणारे नेते म्हणून ना.रामदास आठवले यांच्या पाठीशी जी एम मोरे उभे राहिले. त्यांचे पुत्र डॉ विजय मोरे रिपाइं आठवले पक्षात युवक आघाडी चे राज्य सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. रिपब्लिकन चळवळीशी निष्ठावंत राहण्याचा दिवंगत जी एम मोरे यांचा वारसा त्यांचे पुत्र डॉ विजय मोरे चालवीत आहेत. 



           

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .