इन्स्पायर पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांच्या उपकरणाची राष्ट्रीय पातळीवर निवड.

 इन्स्पायर पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांच्या उपकरणाची राष्ट्रीय पातळीवर निवड.

दिल्ली येथे राष्ट्रस्तर प्रदर्शनासाठी निवड : शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांची माहिती



कार्वे प्रतिनिधी :- ( प्रविण पाटील)

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत 'इन्स्पायर' अवॉर्डसाठी सातारा जिल्ह्यातील ३ उपकरणांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.


यात सातारा जिल्ह्यातील विज्ञान आधारित तीन उपकरणांचा समावेश आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देण्यासाठी व उत्कृष्ट शास्त्रज्ञनिर्मितीसाठी अशी निवड ही पहिली पायरी समजली जाते. सातारा जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याने शिक्षण विभागाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

राज्य सरकारच्या www.inspire.award.in या संकेतस्थळावर नावनोंदणी केल्यानंतर त्यातील उत्कृष्ट प्रोजेक्ट निवडले जातात. त्यांना जिल्हा स्तरावर प्रदर्शनात सादरीकरणाची संधी दिली जाते. यावर्षी राज्यातून निवडलेल्या विविध प्रोजेक्टपैकी सातारा जिल्ह्याने बाजी मारत ३ विद्यार्थ्यांच्या विज्ञान आधारित प्रकल्पांची निवड झाली. विविध जिल्ह्यातील ३३१ प्रकल्पांची राज्यस्तरीय निवड करण्यात आली होती. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील तीन शाळांमधील ३ विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पुरस्कार इन्स्पायर अवॉर्डसाठी पात्र ठरले आहेत. निवड झालेल्यांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज नायगाव (ता. खंडाळा ) ची इयत्ता सातवीतील वैष्णवी संतोष कानडे , सैनिक स्कूल सातारा चा इयत्ता नववी चा श्रेयस सचिन मगदूम तसेच वाई तालुक्यातील परखंदी शाळेचा दहावीचा यश ज्ञानेश शिंदे यांनी यश मिळवले आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली. 

असे केले सादरीकरण

निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी २०२०-२१ मध्ये राज्य सरकारच्या संकेतस्थळावर नावनोंदणी केली. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी प्रकल्पांचा माहितीपूर्ण व्हीडीओ तयार करून ऑनलाइन सादरीकरण केले. त्याचे जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय समितीने परीक्षण केले. निरीक्षण केले. २०२०-२१मध्ये सातारा जिल्ह्यातून इंस्पायर अवार्ड मानक योजनेत २हजार २०३ विद्यार्थ्यांनी आपले नॉमिनेशन केले होते. त्यापैकी २०८ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनासाठी निवड झाली. होती २०८ विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थ्यांची राज्य स्तरासाठी निवड झाली. राज्यस्तर प्रदर्शनातून तीन जणांची उपकरणे राष्ट्र स्तरासाठी निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये नायगाव शाळेची वैष्णवी हिने मल्टीपर्पज फार्मिंग इन्स्टमेट प्रदर्शनात नेले होते. सैनिक स्कूलच्या श्रेयसने सोशल डिझाईन टॅप सिस्टीम फोर हँड वाशिंग उपकरण नेले होते. तर परखंदी शाळेच्या यशने मल्टीपर्पज केटरिंग इकीपेमेंट हे उपकरण नेले होते .

विज्ञान आधारित मॉडेल जिल्हास्तरावर सादर केल्यानंतर त्यातील उत्कृष्ट उपक्रमाची विभाग, राज्यस्तर अशा क्रमाने निवड केली जाते. या स्पर्धेसाठी खासगी मराठी किंवा इंग्लिश मीडियम शाळा नव्हे, तर महापालिकेच्या शाळेनेदेखील विद्यार्थी निवड करून योग्यता दाखवून दिली आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय प्रदर्शन ऑनलाईन घेण्यात आले होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांच्या मदतीने गुगल प्ले स्टोअर मधून ॲप डाऊनलोड करून त्यात व्हिडिओ, ऑडिओ, टेक्स द्वारे आपल्या उपकरणाची माहिती भरायची होती. सातारा जिल्हा नॉमिनेशन च्या बाबतीत राज्यात तिसऱ्या क्रमांकावर तर कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांकावर होता. यासाठी जिल्हा विज्ञान पर्यवेक्षिका मंगल मोरे यांनी श्री कोटेश्वर विद्यालय गोवे विद्यालयाचे उपशिक्षक लक्ष्मण उबाळे यांच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना व्हाट्सअप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, जिल्हा परिषद परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केली आहे.

सरकारी अनुदानाचा लाभ

सहावी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी इन्स्पायर अॅवॉर्डसाठी नामांकन करू शकतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विज्ञान आधारित मॉडेल बनविण्यासाठी सरकारकडून दहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. या रकमेसाठी विद्यार्थ्याच्या बँक खात्याचा तपशील सरकारला ऑनलाइन द्यावा लागतो. हे बक्षीस मूल्य अनुदान विद्यार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा केले जातात.

विज्ञान आणि तंत्रस्नेही शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची कल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासा यामुळे  सातारा जिल्ह्यातील  ३ विज्ञान आधारित प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.''

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .