कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगाव येथे व्यक्तिमत्व विकास व्याख्यानाचे आयोजन.

 कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगाव येथे व्यक्तिमत्व विकास व्याख्यानाचे आयोजन.



उंडाळे - प्रतिनिधी .

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी( डी फार्मसी ) घोगाव, या महाविद्यालयांमध्ये व्यक्तिमत्व विकास व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाचा मुख्य विषय सॉफ्ट  स्किल्स मॅनेजमेंट हा होता.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते डॉ. एस. व्ही. जवळकर सर ( प्राचार्य एस.डी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी इस्लामपूर) हे उपस्थित होते. त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली महाडीक मॅडम यांनी केले. जवळकर सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना स्वतःचे स्किल्स कसे विकसित करायचे, औषध निर्माता म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत, तुमचा सर्व सर्वांगिन विकास होण्यासाठी स्वतःचे ज्ञान कसे वाढवले पाहिजे तसेच शारीरिक व व्यक्तिगत विकास कसे वाढवावे त्याचे फायदे तसेच फार्मसी प्रोफेशनचे महत्व त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातून सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती पाटील मॅडम यांनी केले व प्रास्ताविक मोनिका चवरे मॅडम यांनी केले



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .