रयत जिमखान्याच्या शिवराज पाटील ला राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सलग दूसरे राष्ट्रीय पदक..
रयत जिमखान्याच्या शिवराज पाटील ला राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सलग दूसरे राष्ट्रीय पदक. उंडाळे:- प्रतिनिधि ( प्रदीप पाटील) येथील रयत जिमखान्याचा खेळाडू शिवराज पाटील ने नवी दिल्ली (मंगेशपुरा ) येथे 28 व 29 ऑक्टोबर रोजी ज़ालेल्या गोल्डन कप नॅशनल युथ कराटे गेम्स मधे जूनियर गटात सिल्व्हर पदक पटकावले नुकत्याच शिमला ( बडी) येथे 13 ऑक्टोबर रोजी ज़ालेल्या कराटे स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक पटकावले आहे. त्याने आज पर्यंत राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तराव एकूण 18 पदके पटकावली आहेत त्यात 2 आंतर राष्ट्री पदकांचा समावेश आहे त्याला दादा उंडाळकर स्मारक समितीचे संथापक अध्यक्ष मा.विलासराव पाटील उंडाळकर (काका) अध्यक्ष प.ता. थोरात समितीचे सदस्य मा.विजयसिंह पाटील व रयत जिमखान्याचे प्रशिक्षक प्रमोद पाटील ह्यांचे मार्गदर्शन लाभले.