अन्न व औषध प्रशासनाने जागृतता दाखवण्याची गरज.

 अन्न व औषध प्रशासनाने जागृतता दाखवण्याची गरज.



उंडाळे - प्रतिनिधि (प्रदिप पाटील)

         कराड दक्षिण भागातील ग्रामीण विभागामध्ये करोना संकटामुळे बिघडलेली व्यवस्था  पुर्व पदावर येत असुन विभागातील बहुतांश बाजार पेठांची खरेदी विक्रीसाठी हळुहळु रेलचेल वाढु लागली. याबरोबर तोंडावर आलेला दिवाळी सणाने दुकानदार, व्यवसायाची लगबघ दिसुन येत आहे.करोना संकटकाळात अनेकांनी  खाद्यपदार्थाची विक्री करण्यास प्राधान्य दिले. परंतु असे करताना याव्यवसायासाठी  लागणारी कायदेशीर परवान्याची पुर्तता केली नसलेच बहुतांशी व्यवसायीकांच्यात दिसून येत आहे. यामुळे नियम धाब्यावर बसवून  व्यवसाय केला जात असलेच दिसत. अन्न आणि औषध प्रशासनाने अशा नवख्या व्यावसायिकांवर नजर रोखुन या नुतन व्यवसायिकांच्या व्यवसाय नियमावलीत  आणतात का? हे पाहणे औचित्याचे ठरेल. 

करोनामुळे अनेकांच्या हातातील काम गेले आहे. त्यामुळे घरगुती अन्नपदार्थ तयार करणारे, चहा दुकान, नाश्ता, डबे, भाजीपाला, फळे आदींच्या विक्रेत्यांमध्ये वाढ झाली आहे.  हा व्यवसाय करतांना अन्न सुरक्षा आणि मानके, व्यवसाय परवाना,  कायद्यानुसार परवाना नोंदणी घेणे आवश्यक आहे. हे व्यावसायिक नवे असल्यामुळे त्यांना याबद्दल माहिती नाही. नोंदणी न करताच परवाना न घेता ते व्यवसाय करत आहेत. वास्तविक ही प्रक्रिया ऑनलाइन असून त्यासाठी ठराविक  शुल्क आकारण्यात येते. व्यवसाय सुरू करण्याविषयी अन्न औषध प्रशासन विभागाकडून कुठलीही आडकाठी नाही. केवळ व्यावसायिकांनी आवश्यक ती माहिती मिळवत आधारकार्डसह अन्य कागदपत्राची जोडणी करत नोंदणी करावी, असे आवाहन  केले गेले आहे. नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असुन दुसरीकडे उत्पादक, वितरक,घाऊक विक्रेते यांनीही नवीन व्यवसायिकांकडे नोंदणी आहे की नाही, याची खातरजमा करून माल विक्री करावा. त्यासाठी प्रत्येक खाद्य पदार्थ  व्यवसायिक हा अन्न सुरक्षा मानके  कायद्यान्वये परवाना अथवा नोंदणी धारक असणे आवश्यक आहे. जर घाऊक विक्रेता, वितरक यांनी विना नोंदणी अन्न पदार्थाची विक्री केल्यास ते दंडास पात्र आहेत. परवाना, नोंदणी वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासनााने मोहीम आखली आहे. त्यानुसार रस्त्यालगत वडापाव, चायनीज, भेळ स्टाँल,  छोटे हाँटेल व्यवसायिक,  दूध, नाश्ता, बेकरी व्यवसाय, अशा विविध विकणाऱ्यांकडे तपासणी करण्यात अन्न व औषध प्रशासनाने काळजी पुर्वक लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली असुन शासकिय नियम डावलुन सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळत असणाऱ्या व्यवसायावर कायदेशीर कारवाईची गरज निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाने  देखील  व्यवसायास मान्यता देताना  या परवानाविषयक  प्रमाणपत्रांची मागणी केली पाहीजे.


दिवाळीच्या पार्श्वभूमीवर  खाद्य  पदार्थांची मागणी वाढली आहे. मात्र, खवा, दुधापासून बनलेल्या मिठाईमध्ये भेसळ होण्याचे प्रकारही दिवसागणिक वाढत आहे. याकरिता, राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत भेसळखोरांवर कारवाई केली पाहीजे.



       ही काळजी घ्या!

 दूध, दुग्धजन्य  पदार्थ  ताजेच घ्यावेत


परवाना- नोंदणीधारक विक्रेत्यांकडून मिठाई, किराणा माल खरेदी करा.

मावा व मिठाई शक्यतो ताजीच वापरावी, ती खराब होणार नाही, अशा तापमानात स्वच्छ जागेत ठेवावी, जेणेकरून विषबाधेचे प्रकार होणार नाहीत.


मिठाई, दूध, दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना, ती ताजी आहे की नाही, याची खात्री करावी.


परवानाधारक दुकानातून  बीलाशिवाय  मिठाई, दुग्धजन्य पदार्थ खरेदी करू नयेत.


दुग्धजन्य पदार्थ नोंदणीधारक व परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करावेत.

खवा-मावा खरेदी करतानाही वास आणि रंग यावर लक्ष ठेवा.

उघड्यावरील मिठाई, खवा खरेदी करू नये.

माव्यापासून तयार केलेले पदार्थ २४ तासांच्या आतच खावेत.

मिठाईवर बुरशी आढळल्यास ती खाऊ नये.

मिठाई खराब असल्याची शक्यता किंवा चवीत फरक जाणवल्यास खाऊ नये.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .