खुजगांव येथे युवकाची गळफास घेवुन आत्महत्या

 खुजगांव येथे युवकाची गळफास घेवुन आत्महत्या.




शिराळा -  प्रतिनिधी,

खुजगांव ता. शिराळा येथील शक्ती पांडूरंग सावंत वय वर्ष २२ यांने शेतातील झाडास दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. 

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून मिळालेली माहिती अशी मयत शक्ती सावंत हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत कामाला होता सध्या कोरोनाच्या कालावधीत लाॅकडाऊन झाल्याने तो गावी आई सोबत खुजगांव येथे रहात होता त्याचे वडील व मोठा भाऊ नोकरी निमित्त मुबंई येथे वास्तव्यासआहेत.  शुक्रवारी सकाळी  जनावराना वैरण आणण्यासाठी नेहमी प्रमाणे शक्ति रानात गेला होता तो रोजच्या पेक्षा जास्त वेळ झाला  घरी परत आला नसल्याने आईने शक्ती का आला नाही व कुठे आहे हे बघण्यासाठी शेजारील मुलांना पाटवले असता त्या मुलांना तो टाक्याचा माळ नावाच्या शेतात  झाडाला लटकत असल्याचा दिसून आला पहावयास गेलेल्या मुलांनी याची माहिती घरी शक्तीच्या आईस व गावातील लोकांना दिली याबाबत मयत शक्तीचे चुलते दतात्रय बाबूराव सावंत वय ४० यांनी कोकरूड पोलिसात फिर्याद दिली असून आत्महत्येच कारण आद्याप समजु शकलेल नाही याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम हे आधिक तपास करत आहेत .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .