मांगले येथील बांबर डोंगर परिसरात एक मादी बिबट्या वनविभागाने लावलेल्या सापळ्यात पहाटे जेरबंद

 मांगले येथील बांबर डोंगर परिसरात  एक मादी बिबट्या वनविभागाने लावलेल्या सापळ्यात पहाटे जेरबंद.


 शिराळा -प्रतिनिधी (आनंदा सुतार)

      शिराळा तालुक्यातील मांगले 

येथील बांबर डोंगर परिसरात  एक मादी बिबट्या वनविभागाने लावलेल्या सापळ्यात आज पहाटे जेरबंद झाला, गेल्या वर्षभरात पाळीव प्राण्यांच्या सह माणसांच्या  वर हल्ला करणा-या बिबट्या चा बंदोबस्त करण्याची मागणी मांगले ग्रामसभेत व परीसरातील शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात केली होती. सुगीचा हंगाम लक्षात घेऊन  चार दिवसापुर्वी सापळा लावला होता, 


आज पहाटे सहाच्या सुमारास बिबट्या सापळ्यात अडकल्याचे काही शेतकऱ्यांनी बघीतले , त्या  नंतर वन विभागाच्या 

  पथकाने सकाळीच  बिबट्याला अन्य ठिकाणी सोडून दिले मात्र वनविभागाने ठीकाण सांगितले नाही,

सोशल मीडियाच्या माध्यमातून सकाळी सातच्या सुमारास गावात व परिसरात बातमी पसरली त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती .


गेल्याच महिन्यात  उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या तीन बिबट्या पैकी एका बिबट्याने मोटर सायकल वरून वैरण घेऊन चाललेल्या शेतकऱ्याच्या अंगावर झेप घेऊन जखमी करण्याचा प्रयत्न केला होता .त्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्या ची मोठी दहशत घेतली होती ,

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .