कोडोली येथे रोशनीबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्येकडून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत प्रात्यक्षिक

 कोडोली येथे रोशनीबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्येकडून  नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत प्रात्यक्षिक.

कार्वे प्रतिनिधी :- 

                     कोरोना महामारीमुळे सर्व व्यवसाय डबघाईला आले परंतु आज या महामारीमध्ये खऱ्या अर्थाने देशाला पोसणारा पोशिंदा तर तो शेतकरी आहे. या आधुनिक शेती पद्धतीमुळे रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीचा कस कमी होत आहे. या परिस्थितीमध्ये कृषिकन्या कु.सोनाली कृष्णा जगताप कृषी महाविद्यालय नेसरी यांच्या वतीने ग्रामीण कृषी जागरुकता व औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमाअतर्गत नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.

                          तसेच कंपोस्ट खत तयार करण्यासाठी लागणारे शेण, पालापाचोळा, युरिया,घरचा ओला आणि सुका कचरा, जनावरांचे निर्माल्य यांचा वापर करून कंपोस्ट तयार केले व कंपोस्टिंग काळाची गरज आहे हे दाखवून दिले. तसेच सदर प्रात्यक्षिक करत असताना शेतकऱ्यांना पडलेल्या प्रश्नाचे निरसन कु. सोनाली जगताप हिने केले. प्रात्यक्षिक पूर्ण करण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आर. बी. बिरादार, समन्वय प्रा. एम.डी. माळी, कार्यक्रम अधिकारी प्रा. बि. बि. कडपे व विषय प्रमुख प्रा.पी.वि.घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी भरत जगताप, कृष्णा जगताप व कोडोली येथील शेतकरी उपस्थित होते. हे प्रात्यक्षिक कोविड -19 चे सर्व नियम पालन करून पार पाडले.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .