बिबटयाच्या हल्यात शाळकरी मुलगा जखमी,नशीब बलवंतर म्हणुन वाचले प्राण.
बिबटयाच्या हल्यात शाळकरी मुलगा जखमी,नशीब बलवंतर म्हणुन वाचले प्राण.
"शाहुवाडी तालुक्यातील उखळू गावातील घटना. वनविभागाने बिबटयाचा बंदोबस्त करावा."
वारणावती - प्रतिनिधी ( गणेश माने)
चांदोली धरणाच्या पायथ्याशी असलेल्या शाहुवाडी तालुक्यातील उखळू येथे शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ल्या केला आहे. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अनिकेत भगवान आनुते (वय वर्ष १४) असे त्याचे नाव आहे. वैरण आणण्यासाठी राहुल आनुते सोबत अनिकेत आनुते गेला होता.
काल सकाळी साडे सातच्या दरम्यान प्राथमिक शाळेच्या पाठीमागे वारणानदी काठालगत असणाऱ्या शेतात वैरणीसाठी गेले होते.ऊसातील बांधावरून दोघेजण चालत जात असताना,अचानक बिबटयाने झडप घातली.त्यात अनिकेत जमीनीलगत आडवा झाला.शिवारात कोणीही नसल्याने राहुल आनुते याने आरडा ओरडा करून बिबट्याला धुडकावून लावले.
राहुल याने मोठयाने ओरडायला सुरुवात केली.
त्यामुळे बिबटयाने तेथुन पळ काढला.या झटापटीमध्ये अनिकेतच्या पाठीवर बिबट्याने पंजाने ओरखडे काढले असुन,जखम झाली आहे.त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले आहेत.
रात्री-अपरात्री याच परिसरात बिबट्याचे दर्शन स्थानिक ग्रामस्थांना घडत आहे.तर आता दिवसा दिसणाऱ्या तसेच हल्ला करणाऱ्या बिबटयामुळे नागरीकांच्यातुन भितीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याचे वास्तव्य परीसरातील ऊसाच्या शेतामध्ये असल्याने या परिसरातील शेतकरी शेतीची कामे करण्यासाठी आपला जीव मुठीत घेऊन कामे करत आहे.मानवावर हल्ला करणारी ही या भागातील पहिलीच घटना असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.सध्या परीसरात भात कापणीला व मळणीला सुरुवात झाली असून,शेतकरी वर्ग शेतीच्या कामामध्ये गुंतला आहे.
वनविभागाने बिबटयाचा बंदोबस्त करावा.अशी मागणी ग्रामस्थातुन होत आहे.


Comments
Post a Comment