पाळण्यात घालण्या आगोदरच मुलाच्या पाचवीला केले लंगोट पुजन पैलवान संजय जाधव यांचा मोठा निर्णय
पाळण्यात घालण्या आगोदरच मुलाच्या पाचवीला केले लंगोट पुजन.
पैलवान संजय जाधव यांचा मोठा निर्णय.
शिराळा -प्रतिनिधी ( आनंदा सुतार)
सोंडोली ता.शाहुवाडी जि.कोल्हापुर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे छोटंसं गांव याच गावात राहणारा कुस्तीच्या वेडाने झपाटलेला बाप आपला कुस्तीचा छंद आणि वारसा पुढे चालावा या विचारात गुरफटलेला होता सुदैवाने घरात मुलगा जन्माला आला संपुर्ण घर आनंदी होते .पण देहवेड्या बापाने मुलाला पाळण्यात घालायच्या आगोदरच कुस्तीच्या आखाड्यात उतरवले.
आपल्यापेक्षा सवाई पहलवान ठरेल असा मुलगा व्हावा असं अनेकांना वाटतं. पण संजय जाधव यांचे अनुकरन करुन प्रत्येक पालकांनी आपला मुलगा सवाई ठरावा असे स्वप्न उराशी बाळगावे लागेल तरच कुस्तीची कहाणी
बदलू शकेल.
पोरांचे हट्ट पुरवता पुरवता आई वडिलांची हयात निघून जाते.तरीही पोरगं काय मार्गावर येत नाही. गाडी , मोबाईल , कपडे , आगळ्या वेगळ्या हेअर स्टाईल अशा अनेक गोष्टीमध्ये आजची पिढी गुरफटत चालली आहे.त्यातच व्यसनाधिनता फार फोफावू लागली आहे याचे मुख्य कारण पालकांचा बेजबाबदारपणा होय. पालकांनी मुलांचा कोणता हट्ट पुरवावा ही आत्मचिंतन करावयाची बाब आहे.
तमाम महाराष्ट्राने एक आदर्श घ्यावा अशी गोष्ट आहे पै.संजय जाधव हे सोंडोली गावचे कुस्ती वेढे त्यांनी आपल्या मुलाच्या पाचवीलाच लंगोट पुजन केले.स्वत:ला सुसंस्कृत व सुशिक्षित समजणा-यांना कुस्ती हा खेळ अतिशय गावढळ वाटतो. अशा लोकांच्या भुवया आपोआप उंचावतील. माञ संजय जाधव यांनी आपला मुलगा पैलवान करायचा हा निश्चयच केला आणि बाळाच्या पाचवीलाच लंगोट पुजला.
भुवया उंचावणार्या सुज्ञ पालकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेणे गरजेची आहे.आपली पोरं घरातुन बाहेर जातात. काय करतात काय खातात काय पितात याकडे लक्ष द्यायचं सोडाच उलट त्यांचे नको ते हट्ट पुरविले जातात मग पुढे जाऊन तिच पोरं आई बापाला मान खाली घालायला लावतात. जोपासायचं काय, वाढवायचं काय ,जर टिकवायचं असं वाटेल तेव्हा सर्वानी पै.संजय जाधव डोळ्यासमोर धरावा.तरच येणा-या काळात भारत देशात बलदंड , सशक्त , निर्व्यसनी पिढी निर्माण होईल आणि आईबापांना पश्चातापाची वेळ येणार नाही.
🔵 पै.राहुल जाधव कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष

Comments
Post a Comment