'फकिरा' च्या सत्वशोध ग्रंथाचे प्रकाशन.
'फकिरा' च्या सत्वशोध ग्रंथाचे प्रकाशन .
सांगली - प्रतिनिधी (आनंदा सुतार)
आण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मयीन कार्य जागतिक स्तरावरचे आहे. त्यांनी सर्वसामान्य माणसाला साहित्यात स्थान देऊन त्यांचे जगणे वैश्विक पातळीवर मांडले आहे. त्यांच्या 'फकिरा ' सारख्या महत्त्वाच्या कादंबरीची सर्वांगाने समीक्षा होणे गरजेचे होते. त्याची पूर्तता युगदक्ष वाङ्मय परिवाराने संयोगित केलेल्या व जनाई प्रकाशन प्रकाशित 'फकिरा' चा सत्वशोध अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी गौरव ग्रंथ खंड १ या समीक्षाग्रंथाने पूर्ण केली आहे. याचे मराठी वाचकांनी उत्स्फुर्तपणे स्वागत करावे. असे समिक्षेचे दहा खंड प्रकाशित करण्याचे महत्वपुर्ण काम कबीर दास हे फार निष्ठेने करत आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो." असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथे केले.
ते 'फकिरा' चा सत्वशोध या समीक्षाग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी डॉ. बळीराम गायकवाड, सुनिल वारे , प्रशासकीय अधिकारी मधुकर गायकवाड साहेब, बळीराम नेटके, प्रशांत पाटील, बाबुराव मुखेडकर, सुदाम धुपे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
' फकिरा' चा सत्वशोध हा ग्रंथ अण्णा भाऊ साठे यांच्या 'फकिरा' कादंबरीची मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत चिकित्सा करणारा समीक्षाग्रंथ आहे . ग्रंथाचे संपादक कबीर दास असून कार्यकारी संपादक डॉ.धनंजय होनमाने आणि वाड्मय तज्ज्ञ - डॉ. प्रकाश दुकळे आहेत .
ग्रंथामध्ये डॉ . नागनाथ कोतापल्ले, डॉ. प्रभाकर मांडे, प्रा. दत्ता भगत , डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ.अरुणा ढेरे, डॉ. सूर्यनारायण रणसुभे, डॉ. माया पंडित, डॉ. मोहन पाटील , डॉ.बळीराम गायकवाड आणि इतर मान्यवर लेखक, संशोधक आणि अभ्यासक यांचे लेख आहेत . तर मुंबई येथील जनाई प्रकाशन यांनी ग्रंथ प्रकाशित केला आहे .

Comments
Post a Comment