सामाजिक विकासासाठी महिलांना सक्षम करण्याचे कार्य करणार. उपाध्यक्षा सारिका मंडले.
सामाजिक विकासासाठी महिलांना सक्षम करण्याचे कार्य करणार._____उपाध्यक्षा सारिका मंडले.
कराड - प्रतिनिधि.
कराड येथील एस के फायनान्सेस सर्विस ने आयोजित केलेल्या महात्मा गांधी जयंती च्या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे कंपनीचे सेल्स मॅनेजर ऋषी जाधव, गणेश लोखंडे, अर्चना भिसे, रोहिणी माने यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांचे हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्या प्रसंगी बोलताना उपाध्यक्ष म्हणाल्या की महिलांना सक्षम करण्याचे कार्य मी करणार आहे. कोणत्याही खासगी कंपनीमध्ये दहा पेक्षा जास्त महिला कामगार काम करत असतील तर त्या ठिकाणी तक्रार निवारण समिती स्थापन केली जाते हा नियम शासकीय असुन याची अंमलबजावणी करावी असे आवाहन करण्यात आले. कंपनीचे चेअरमन प्रतिक शहा व्हा चेअरमन अजिंक्य खरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कंपनीने अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली.
कराड : - एस के फायनान्सेस सर्विस ने आयोजित केलेल्या महात्मा गांधी जयंती च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले.


Comments
Post a Comment