माझ्या प्रभागात न झालेले काम दाखवा,51000 मिळवा- विक्रमभाऊ पाटील.

 माझ्या प्रभागात न झालेले काम दाखवा,51000 मिळवा- विक्रमभाऊ पाटील.

इस्लामपूर - प्रतिनिधी. ( निता बनसोडे.)

इस्लामपूर प्रभाग पाच मधे नगरसेवक विक्रमभाऊ पाटील यांचे हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी प्रभाग पाच मधे विविध रस्त्यांची कामे, नाल्यांची कामे, अंडरग्राउंड नाले, याची सुरवात करण्यात आली.

या प्रसंगी विक्रमभाऊ पाटील म्हणाले, माझ्या प्रभागात मी विविध विकासकामे केलेली आहेत, प्रभागातील न झालेले काम दाखवा अन 51000मिळवा असं खुले आवाहन या प्रसंगी भाऊंनी दिले.

गोरगरीब, सर्वसामान्यांच्या विधार्थ्यांसाठी भाऊंच्या माद्यमातून जवळपास दीड कोटीचे वाचनालय मंजूर केले आहे.

तसेच या भागातील गुन्हेगारी जवळपास मोडीत काढली आहे.भाऊंनी यासाठीही चांगले प्रयत्न केले आहेत. एक आदर्श भागाप्रमाणे सदर भाग विकसित करण्यात येणार असल्याचे सांगितले.पाणीपुरवठा, वीज, रस्ते यांच्या विकासकामावर भाऊंनी चांगलाच भर दिला आहे. मिळणाऱ्या सुविधा बाबत नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या प्रसंगी उपस्थित धनश्री  चव्हाण , युवा नेत्या श्रेया जाधव, किरण बामणे, संजय रोकडे अमोल जाधव, केंडे मॅडम,महापुरे, वसंत जाधव, रजपूत आदी नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .