शासकीय कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत देणार ओंड गावातील शेतकऱ्यांना कृषीचे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण.

 शासकीय कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत देणार ओंड गावातील शेतकऱ्यांना कृषीचे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण.

काले - प्रतिनिधी.

ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्न कार्यक्रम अंतर्गत कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांचे ओंड, ता. कराड येथे आगमन झाले असून हे कृषीदूत ओंड गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान याबद्दल माहिती देऊन प्रत्यक्ष  प्रात्यक्षिक  देणार आहेत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालयातील अंतिम सत्राचे विद्यार्थी प्रतीक कोडगे, रोहित भोसले, प्रशांत सोनलकर, अभिजीत पवार, निशांत संकपाळ, रामेश्वर शेळके, कैवल्य माने हे ओंड गावात कृषीदूत म्हणून दाखल झाले आहेत. ओंड गावच्या सरपंच सौ.मनीषा माने उपसरपंच श्री.सचिन थोरात, ग्रामपंचायत सदस्य तुषार थोरात, रघुनाथ बामणे व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .