आंबेडकरवादी सेनेची राजकीय वाटचाली संदर्भात बैठक.

 आंबेडकरवादी सेनेची राजकीय वाटचाली संदर्भात बैठक.

इस्लामपूर - प्रतिनिधी.(निता बनसोडे.)

आंबेडकरवादी सेनेची राजकीय वाटचाली संदर्भात बैठक संपन्न झाली.आंबेडकरवादी सेना सामाजिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न तसेच महिला, विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न यांवर काम करते. यापुढे शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी ही आंबेडकरवादी सेना लढत राहील यासाठी आगामी निवडणुकीत आंबेडकरवादी सेना आपली भूमिका स्पष्ट करेल,असं स्पष्ट मत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जाहीर केले होते.

त्यांचं अनुषंगाने आज शासकिय विश्रामगृह सर्किट हाऊस या ठिकाणी रयत क्रांती संघटना / हरित सेनेचे कर्नाटक राज्याचे कार्याध्यक्ष मा.राजू पवार यांनी  प्रमुख पदाधिकारी यांची भेट घेवून यापुढील होवू घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणूका या एकत्र येऊन लढवू आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा विधानसभेसाठी समविचारी पक्ष संघटनांना एकत्र घेवून समविचारी परिवर्तनवादी आघाडी स्थापन करून उमेदवार जाहीर करु असे आश्वासन दिले.

लवकरच वेगवेगळ्या पक्ष संघटना यांना एकत्र घेवून राजकिय वज्रमूठ तयार करून लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. येत्या काही दिवसांत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली जाईल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा.बबनराव कावडे यांनी केले.यावेळी आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.सुहास हुपरीकर , महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा.बबनराव कावडे , महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते मा.शाहीद शेख , कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.सचिन आडसूळे , कोल्हापूर जिल्हा महासचिव मा.सुहेल शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .