कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाचे आयोजन.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाचे आयोजन.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे ऑरोबिंदू फार्मा येथील सीनिअर एक्झिक्युटिव्ह किरणकुमार ओव्हाल यांचे टॅबलेट टुलिंग या विषयावरती व्याख्यान संपन्न झाले.
औषधनिर्माण शास्त्रातील विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये औषधे विशेषता टेबलेट्स कशा प्रकारे तयार केली जातात व त्यासाठी लागणारी विविध साधने, मशिनरी कशाप्रकारे असते ती कशी हाताळायची असते हे विद्यार्थ्यांना खूप सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितले.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.तर सूत्रसंचालन व आभार प्रा. मोनिका चवरे यांनी मानले.
********


Comments
Post a Comment