कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं सातारा जिल्ह्यात पहिले राष्ट्रीय मानांकन प्राप्त महाविद्यालय.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं सातारा जिल्ह्यात पहिले राष्ट्रीय मानांकन प्राप्त महाविद्यालय.

उंडाळे -प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्म) घोगाव येथे नॅशनल बोर्ड ऑफ ऑक्रिडिटेशनची नवी दिल्ली यांच्या टीमकडून नुकतीच भेट दिली. त्यांनी तीन दिवस महाविद्यालयाचे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली त्यानंतर त्यांनी केलेल्या मूल्यांकनानुसार महाविद्यालयाला 30 जून 2026 पर्यंत मान्यता प्रदान करण्यात आली. आत्तापर्यंत सलग तीन वर्षाकरिता प्रथम प्रयत्नात एनबीएची मान्यता मिळवण्याचे सातारा जिल्ह्यातील हे  पहिले आणि महाराष्ट्रातील सहावे महाविद्यालय ठरले आहे.  या महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत येथील विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यात महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे. महाविद्यालयातील तज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, मशीनरूम, संगणककक्ष, क्लासरूम  यामुळे विद्यार्थ्यांचे आकांक्षा याच महाविद्यालयातून शिक्षण घ्यावी अशी होते. तसेच  कॅन्टीन, बस वाहतूक व्यवस्था, मेडिसिनल गार्डन, सेमिनार हॉल, खेळासाठी सुसज्ज मैदान अशा सोयी सुविधा उपलब्ध आहेत. महाविद्यालयाला एनबीए मान्यता मिळविण्याबद्दल  संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, उपाध्यक्षा अनुराधा गांधी, सचिव प्रसून जोहरी, खजिनदार प्राजक्ता जोहरी संचालक अशोक जोहरी यांनी  प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजी,माझी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .