मा. दीपक लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप .
मा. दीपक लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप .
कराड- प्रतिनिधी.
येवती गावचे सुपुत्र चंद्रभागा रूरल डेव्हलपर चे संस्थापक अध्यक्ष मा. दीपक लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे व यैवती गावचे ग्रा.पं सदस्य ,देवांशी कन्स्ट्रक्शन चे अध्यक्ष महादेव शेवाळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष राहुल भोसले ,कृणाल आंबवडे , अभिजीत आंबवडे ,यश तिरमारे ,प्रणित थोरवडे, संदीप थोरवडे.निधी बँकचे सिद्धार्थ वाघमारे सुधीर कांबळे ,अंकुश कांबळे ,निकम तात्या , उपस्थित होते .यावेळी बोलताना भोसले म्हणाले की ,दीपक दादा लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेला हा उपक्रम खरोखरच आदर्शवत आहे. याची प्रेरणा आमच्यासारख्या तरुणांनी घेऊन त्यांनी देखील अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करावा, व रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले .या उपक्रमाबद्दल त्यांनी पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे व ग्रामपंचायत सदस्य महादेव शेवाळे यांचे आभार मानले .

Comments
Post a Comment