कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाविषयी माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
आजकालच्या धावपळीच्या व महागाईच्या युगामध्ये फक्त एकच व्यवसाय व एकच नोकरी यावर अवलंबून न राहता विविध गोष्टी शिकल्या पाहिजेत तसेच स्पर्धा परीक्षेमधून उत्तम नोकरी कशी मिळवता येईल यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत यासाठी के राज यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळेस स्पर्धा परीक्षांसाठी काय अभ्यासक्रम असतो व कसा अभ्यास केला पाहिजे, वेळेचे नियोजन कसे करायला हवे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. मोनिका चवरे यांनी मानले.

Comments
Post a Comment