कै.बाबाराम कांबळे यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबीर संपन्न.

 कै.बाबाराम कांबळे यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबीर संपन्न.

शिराळा - प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.)

ग्रामपंचायत वाकुर्डे खुर्द व वि.का.स.सेवा सोसायटी वाकुर्डे खुर्द यांचे सहकार्याने व कै.बाबाराम कांबळे आप्पा यांच्या स्मरणात प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर व टेके आय केअर सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 08/01/2024 रोजी  वाकेश्वर मंदिर वाकुर्डे खुर्द या ठिकाणी मोफत आरोग्य नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न झाले.शिबिराचे उद्घाटन युवा नेते मा श्री. रणधीर नाईक  व शिराळा पोलिस स्टेशनचे पी. आय.सिद्धेश्वर जंगम  तसेच वंचित बहुजन आघाडीचे वसंतराव कांबळे  यांच्या  हस्ते संपन्न झाले.

     या कार्यक्रमास उपस्थिती सांगली जिल्हा मुजफडेशनचे संचालक रणजीत बाबाराम वाकुर्डेकर तसेच सरपंच शितल पाटील,सेवा सोसायटीचे चेअरमन गजानन पाटील, गौतम पाटील, मुंबई पोलीस विश्वास पाटील, निनाई कारखान्याचे संचालक तानाजी जाधव, युवराज जाधव, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, सागर शिराळकर ,मोहन गुरव, शारदा घेवदे,सेवा सोसायटीचे सदस्य यशवंत जाधव, मारुती कांबळे, जालिंदर कांबळे, डॉ.भास्कर कांबळे, शामराव खिलारे, अशोक पाटील, शामराव जाधव, वसंत जाधव, अंकुश खिलारे, ग्रामसेवक अमोल बाबर, हिंदुराव कांबळे, महादेव घेवदे,दिपक कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .