शिवप्रसाद टिंगरे यांची राष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड.
शिवप्रसाद टिंगरे यांची राष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड.
कराड : प्रतिनिधी. (प्रवीण पाटील.)
सातारा येथील सैनिक स्कुल सातारा चे विज्ञान विषयाचे शिक्षक श्री शिवप्रसाद टिंगरे यांची भारत सरकारच्या *एज्युकेशन फॉर इन्सस्पयरींग इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान शिक्षकांच्या कार्यशाळेसाठी निवड करणेत आली आहे. भारत सरकारच्या - इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल -2023 अंतर्गत नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन च्या वतीने फरिदाबाद (हरियाणा) येथे चालणाऱ्या 4 दिवसीय कार्यशाळेत महाराष्ट्रातील श्री टिंगरे यांच्यासह 25 शिक्षकांची निवड झाली आहे. या चार दिवसीय कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील शिक्षणं क्षेत्रात विज्ञान विषयात नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांचे चर्चासत्र संपन्न होणार आहे. भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत हि कार्यशाळा 17 ते 20 जानेवारी दरम्यान संपन्न होत आहे. सदर कार्यशाळेमध्ये श्री. टिंगरे हे दैनंदिन अध्यापन प्रक्रियेत उपयोगात आणत असलेल्या नाविन्यपूर्ण पद्धतीची महिती देणार आहेत. श्री टिंगरे यांच्या हया निवडी बद्दल सैनिक स्कूल सातारा चे प्राचार्य कॅप्टन भारतीय नौसेना के श्रीनिवासन, उपप्राचार्य लेफ्टनंट कर्नल मनीषा दबस, प्रशासकीय अधिकारी विंग कमांडर गौरव शेरॉन तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे व सातारा जिल्हा इन्स्पायर अवॉर्ड जिल्हा समन्वयक श्री लक्ष्मण उबाळे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment